AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Points Table | दिल्लीच्या विजयाने पॉइंट टेबलमध्ये मोठा ट्विस्ट, मुंबईपेक्षा जास्त ‘या’ संघाला लागली लॉटरी

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : दिल्लीने पंजाबचा पराभव करत मुंबई, आरसीबी यांच्यातील आणखी एक संघ असलेल्या पंजाबला बाहेर केलं आहे. आता पॉइंट टेबलवर काय परिणाम झाला आहे? पंजाब संघाच्या पराभवाने नेमका कोणाचा फायदा झाला असावा? 

IPL 2023 Points Table | दिल्लीच्या विजयाने पॉइंट टेबलमध्ये मोठा ट्विस्ट, मुंबईपेक्षा जास्त 'या' संघाला लागली लॉटरी
| Updated on: May 18, 2023 | 12:57 AM
Share

मुंबई : आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामन्यामध्ये दिल्लीकरांनी विजय मिळवला आहे. निसटत्या विजयासह दिल्लीने पंजाब संघाचं प्ले-ऑफमध्ये जाण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं आहे. या विजयानंतर आता पॉइंट टेबलवर काय परिणाम झाला आहे? पंजाब संघाच्या पराभवाने नेमका कोणाचा फायदा झाला असावा?

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

दिल्लीने पंजाबचा पराभव करत प्ले-ऑफच्या रेसमध्ये असलेल्या मुंबई, आरसीबी यांच्याबरोबरीचा आणखी एक संघ असलेल्या पंजाब संघाला बाहेर केलं आहे. आता पंजाबसाठी चमत्काराचीच आवश्यकता असून ते काही शक्य वाटत नाही. मात्र मुंबई आणि आरसीबी हे दोन्ही संघ दिल्लीच्या विजयाने आनंदी असणार आहेत. कारण आता पंजाबने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तरी त्यांचे 14 गुण होणार आहेत.

पहिल्या चार संघांमध्ये आता पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या लखनऊचे 15 तर चौथ्या क्रमांकावरील मुंबईचे 14 गुण आहेत.  फक्त आरसीबीसाठी मोठी संधी आहे कारण आता त्यांचे दोन सामने बाकी असून त्यांनी जर दोन्ही जिंकले तर त्यांचे 16 गुण होतील. आरसीबीसाठी ही मोठी संधी असली तरी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

मुंबई इंडिअन्स संघाला पण अशीच संधी आली होती. मात्र लखनऊविरूद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे गणित आणखी किचकट होऊन बसलं आहे. तर दुसरीकडे राजस्थानचा विचार केला तर त्यांचाही एकच सामना राहिला असून त्यामध्ये विजय मिळवला तर 14 गुण होतील.

आजच्या सामन्याचा धावता आढावा

आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला 15 धावांनी पराभूत केलं. पंजाब किंग्सला हा विजय आवश्यक होता. मात्र दिल्लीने पंजाबचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं खरं पण रिली रोस्सोच्या आक्रमक खेळीमुळे पंजाबला मोठं आव्हान मिळालं. रोस्सोने 37 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. दिल्लीने पंजाबसमोर 20 षटकात 2 गडी गमवून 213 धावांचं आव्हान दिलं. मात्र पंजाबचा संघ 8 गडी गमवून 198 धावा करू शकला. एकट्या लियम लिव्हिंगस्टोन याने 94 धावांची वादळी खेळी केली. मात्र समोरून त्याला कोणाची साथ न मिळाल्याने पंजाबला सामना गमवावा लागला.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.