AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Points Table: लखनौच्या विजयाने कोलकाता आणि हैदराबादचं टेन्शन वाढलं, आता प्लेऑफ रंगतदार वळणावर

IPL 2024 Points Table: आयपीएल 2024 स्पर्धेतील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने धावांनी जिंकला. या विजयासाठी टॉप 4 मध्ये खळबळ उडाली आहे.

IPL 2024 Points Table: लखनौच्या विजयाने कोलकाता आणि हैदराबादचं टेन्शन वाढलं, आता प्लेऑफ रंगतदार वळणावर
| Updated on: Apr 23, 2024 | 11:50 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतलं प्लेऑफचं गणित आता रंगतदार झालं आहे. 39 सामन्यानंतरही कोणीही प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेलं नाही. तसेच प्लेऑफच्या शर्यतीततून कोणाचाही पत्ता कापला गेलेला नाही. राजस्थान रॉयल्स 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. पण त्यांनाही उर्वरित सहा सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. अन्यथा त्यांनाही देव पाण्यात बुडवून ठेवावे लागतील. गेल्या पर्वातही राजस्थान रॉयल्सने चांगली कामगिरी केली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात वारंवार झालेल्या पराभवामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगलं होतं. तर मुंबई इंडियन्सने शेवटच्या टप्प्यात चांगली कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.  चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 39 वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं गेलं. मात्र लखनौ सुपर जायंट्सने हे आव्हान 6 गडी राखून पूर्ण केलं. मार्कस स्टोयनिसच्या नाबाद 124 धावांच्या खेळीमुळे विजय सोपा झाला. लखनौला दोन गुण मिळाले असून नेट रनरेटही जबरदस्त वाढला आहे. त्यामुळे चेन्नईची पाचव्या स्थानावर घसरण, तर लखनौ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

राजस्थान रॉयल्सने 8 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. 14 गुण आणि 0.698 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे.कोलकाता नाईट रायडर्स 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवत दुसर्या स्थानावर आहे. कोलकात्याचे 10 गुण असून 1.206 नेट रनरेट आहे. सनरायझर्स हैदराबादने 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुण आणि 0.914 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. लखनौचे 10 गुण झाले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवामुळे 8 गुण असून पाचव्या स्थानी आहे. लखनौ सुपर जायंट्सचा रनरेट हा कोलकाता आणि हैदराबादच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लगाणर आहे. असं असलं तर तिघांचे एकसारखे गुण आहेत. त्यामुळे पुढे ही लढत आणखी चुरशीची होणार आहे.

गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.055 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.227 नेट रनरेटसह सातव्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स 6 गुण आणि -0.477 नेट रनरेटसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्स हा नवव्या स्थानावर असून 4 गुणांसह -0.292 नेट रनरेट आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. सर्वात शेवटच्या स्थानी असून 2 गुणांसह -1.046 नेट रनरेट आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.