IPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचं गणित फिस्कटलं! इतक्या सामन्यात विजय मिळवावा लागणार

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर मोठी उलथापालथ झाली आहे. राजस्थानने मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना जिंकत प्लेऑपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता फक्त एक विजय मिळवताच राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करणार आहे.

IPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचं गणित फिस्कटलं! इतक्या सामन्यात विजय मिळवावा लागणार
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 11:57 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 179 धावा केल्या आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 18.4 षटकात एक गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थान रॉयल्सने प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलं आहे. आता राजस्थान रॉयल्सने उर्वरीत सात सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात विजय मिळवताच राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे गुणतालिकेत जबर फटका बसला आहे. गुणतालिकेत सातवं स्थान कायम असलं तरी नेट रनरेटवर जबर परिणाम झाला आहे. आता उर्वरित सहा सामन्यापैकी पाच सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. इतकंच काय तर नेट रनरेटही कायम ठेवावा लागेल.

राजस्थान रॉयल्सचा संघ 7 सामन्यात विजय मिळवत 14 गुणांसह पहिल्या स्थानवर आहे. कोलकात्याचा सघ 10 गुण आणि 1.206 नेट रनरेटसह दुसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 10 गुण आणि 0.914 नेट रनरेटसह तिसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.529 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर, लखनौ सुपर जायंट्स 8 गुण आणि 0.123 नेट रनरेटसह पाचव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.055 नेट रनरेटसह सहाव्या, मुंबई इंडियन्स संघ सातव्या स्थानी आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने नेट रनरेटवर परिणाम झाला आहे. मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट हा -0.227 इतका आहे. दिल्ली कॅपिटल्स 6 गुण आणि -0.477 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.292 नेट रनरेटसह नवव्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 गुण आणि -1.046 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.