IPL 2024 Points Table : आरसीबीचा प्लेऑफमधून पत्ता कट! उर्वरित 9 संघांमध्ये जबरदस्त चुरस

IPL 2024 Points Table: आयपीएल 2024 स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यातील निकालामुळे गुणतालिकेवर प्रभाव पडला आहे.

IPL 2024 Points Table : आरसीबीचा प्लेऑफमधून पत्ता कट! उर्वरित 9 संघांमध्ये जबरदस्त चुरस
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 11:22 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत 21 एप्रिल रोजी दोन सामने पार पडले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. या दोन्ही सामन्यांमुळे गुणतालिकेवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या एक धावेने आरसीबीला पराभूत केलं. यामुळे आरसीबीचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं आहे. कारण आता गुणतालिकेचं गणित पाहता  प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या पर्वातही आरसीबीची झोळी रिती असेल हे आता नक्की झालं आहे. तर प्लेऑफच्या रेसमध्ये अजूनही 9 संघ आहेत. अजूनही कोणाचं काही निश्चित झालेलं नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात ही शर्यत आणखी चुरशीची होणार आहे.  दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सच्या झोळीत आणखी दोन गुणांची कमाई झाली आहे. त्यामुळे 10 गुणांसह कोलकात्याचा संघ राजस्थानच्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 7 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह गुजरात टायटन्सला गुणतालिकेत जबर फायदा झाला आहे.

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सला मात देत सहावं स्थान गाठलं आहे. थेट आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह पहिल्या, कोलकाता नाईट रायडर्स 10 गुण आणि 1.206 नेट रनरेटसह दुसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 10 आणि 0.914 नेट रनरेटसह तिसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.529 नेट रनरेटसह पाचव्या, लखनौ सुपर जायंट्स 8 गुण आणि 0.123 नेट रनरेटसह पाचव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.055 नेट रनरेटसह सहाव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.133 नेट रनरेटसह सातव्या, दिल्ली कॅपिटल्स 6 गुण आणि -0.477 नेट रनरेटसह आठव्या, पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.292 नेट रनरेटसह नवव्या आणि आरसीबी 2 गुण आणि -1.046 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 सर्वबाद 221 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अवघ्या एका धावेने पराभव झाला.

Non Stop LIVE Update
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.