AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket: एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर, कर्णधार कोण?

Test Cricket: क्रिकेट बोर्डाने एकमेव कसोटी सामन्यासाठी अवघ्या 8 सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.

Test Cricket: एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर, कर्णधार कोण?
IRELAND CRICKET TEAM
| Updated on: Jul 17, 2024 | 6:58 PM
Share

झिंबाब्वेला विरुद्ध टीम इंडिया यांच्यात काही दिवसांपूर्वी टी 20 मालिक पार पडली. टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. झिंबाब्वेला घरात पाहुण्या आणि युवा संघाकडून पराभूत व्हावं लागलं. झिंबाब्वेने मालिकेतील पहिला सामना जिंकून जोरदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयी चौकार लगावत मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर टीम इंडिया आता झिंबाब्वे दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे.

तर दुसर्‍या बाजूला झिंबाब्वे आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या एका कसोटीसाठी आयर्लंड क्रिकेट बोर्डाने 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयसीसी आणि आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. गेविन होई या युवा लेग स्पिनरची पहिल्यांदाच टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच अँड्रयू बालबर्नी हा आयर्लंडचं नेतृत्व करणार आहे. अँड्रयूला 8 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. तर क्रेग एर्विन हा झिंबाब्वेचा कर्णधारपद सांभाळणार आहे.

सामना कधी आणि कुठे?

दरम्यान आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील एकमेव कसोटी सामना हा 25 ते 29 जुले दरम्यान बेलफास्ट येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.त्यामुळे एकमेव सामना कोणती टीम जिंकते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आयर्लंड संघ जाहीर

आयर्लंड कसोटी संघ: अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडाअर, कर्टिस कॅम्फर, गेविन होई, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रेज, अँडी मॅकब्राईन, बॅरी मॅककार्थी, जेम्स मॅककोलम, पीजे मूर, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर आणि क्रेग यंग.

एकमेव कसोटी सामन्यासाठी झिंबाब्वे टीम: क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, तनाका चिवांगा, जॉयलॉर्ड गुम्बी, रॉय काईया, क्लाइव्ह मदांडे, वेलिंग्टन मसाकादझा, प्रिन्स मासवारे, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्स, रिचर्ड एनगारावा, व्हिक्टर न्याउची आणि सीन विल्यम्स.

'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.