AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan kishan 200: इशान किशनने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, सोबत रचला हा इतिहास

बांगलादेश विरुद्ध इशान किशनने दुहेरी शतक ठोकत नवा इतिहास रचला आहे. त्याने यावेळी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत,

Ishan kishan 200: इशान किशनने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, सोबत रचला हा इतिहास
| Updated on: Dec 10, 2022 | 3:00 PM
Share

Ishan Kishan 200 : वनडे मालिकेतील सर्वात जलद 200 धावा करणारा इशान किशन (Ishan Kishan Double Century) पहिला खेळाडू ठरला आहे.याआधी सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर होता.गेलने 138 चेंडूत वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक पूर्ण केले होते.भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh ODI) यांच्यातील तीन सामन्यांच्या शेवटच्या सामन्यात इशान किशनने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण करत नवा इतिहास रचला आहे.

इशान किशन सर्वात जलद 150 धावा (Fastest 150 In ODI) करणारा भारतीय फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या (Virendra Sehwag) नावावर होता.त्याने 112 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. इशान किशन चट्टोग्राममध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. तो बांगलादेशविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरलाय. याआधी बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.

बांगलादेशच्या सर्वच गोलंदाजांना त्याने धुतलं. 50 चेंडूत अर्धशतक, 85 चेंडूत शतक, 103 चेंडूत 150 धावा केल्यानंतर या इशान किशनने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले.इशान 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला.

24 चौकार आणि 10 षटकार

या ऐतिहासिक खेळीत ईशान किशनने 24 फोर आणि 10 सिक्ससह 156 धावा केल्यात. इशान किशनने दोनशे धावा करत असताना एकामागून एक अनेक विक्रम मोडीत काढले.24 वर्षीय ईशान सर्वात द्विशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे.

4 वर्षानंतर वनडेमध्ये द्विशतक

इशान किशनच्या आधी रोहित शर्माने वनडेमध्ये तीन वेळा द्विशतक झळकावले आहे.रोहितशिवाय सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, मार्टिन गुप्टिल आणि फखर जमान यांच्या नावावरही वनडे क्रिकेटमध्ये द्विशतके ठोकण्याचा विक्रम आहे. पहिल्यांदा क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा चमत्कार केला होता. वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचे द्विशतक 2018 मध्ये आले होते. जेव्हा पाकिस्तानच्या फखर जमानने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 210 धावा केल्या होत्या.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.