AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 आधी पंजाबचे 18 कोटी पाण्यात? लंगडा घोडा संघात ठेवत पायावर मारून घेतला दगड

IPL 2024 : पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत कर्णधारपदी अनेक बदल केलेले पाहायला मिळाले. मात्र पंजाबकडून काही खास कामगिरी पाहायला मिळत नाही. आधीच दुष्काळ असताना पंजाब टीम मॅनेजमेंटने संघात लंगड्या खेळाडूला ठेवल्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

IPL 2024 आधी पंजाबचे 18 कोटी पाण्यात? लंगडा घोडा संघात ठेवत पायावर मारून घेतला दगड
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 04, 2023 | 7:36 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 च्या सीझनआधी सर्व संघांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. आयपीएल लिलावाला आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. काही फ्रँचायझींनी आपल्या संघातील बड्या खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंची नावं आहेत. मात्र पंजाब संघाने एक मोठा निर्णय घेतला असून तो भविष्यात त्यांना घातक ठरू शकतो. कारण रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये एक खेळाडू लंगडा घोडा असल्यासारखा आहे.

कोण आहे तो खेळाडू?

पंजाबच्या टीम मॅनेजमेंटने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीचा खेळाडू आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सॅम करन आहे. पंजाब संघासाठी त्याला रिटेन करण्याचा निर्णय आत्मघातक ठरू शकतो. मागील सीझमध्येही सॅम करन याला पंजाबने मोजलेल्या पैशाप्रमाणे छाप पाडता आली नव्हती.

आता सुरू असलेल्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील पहिल्या वन डे सामन्यामध्ये इंग्लंड संघाचा पराभव झाला. इंग्लंड संघाने 325-10 धावा केल्या होत्या, या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये १९ धावांची गरज होती आणि इंग्लंडकडून सॅम करन बॉलिंग करत होता. त्यावेळी अल्झारी जोसेफ याने एक धाव काढत शाई होपला स्ट्राईकला दिली. त्यानंतर होपने करन याला तीन सिक्स  मारत सामना जिंकवला.

पंजाब संघाने सॅम करनसाठी 18.50 कोटी रूपये मोजले होते. यंदाही पंजाबने त्याला संघात कायम ठेवल्याने क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे. कारण करनला रिलीज केलं असतं  तर लिलावासाठी पंजाबकडे आणखी पैसे वाढले असते. मात्र इतके पैसे लावून पंजाबने त्याला विकत घेतलं म्हणजे त्याच्यामागे काहीतरी कारण असावं. मात्र यंदाच्या सीझनमध्येही सॅम करन फेल गेला तर पंजाबसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे लंगड्या घोड्याला संघात ठेवल्याचीही चर्चा क्रिकेट वर्तुळात होताना दिसत आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...