Cricket | युवा गोलंदाजाचं मैदानातच निधन, बॉलिंग रनअप दरम्यान जगाचा निरोप

Cricket News | क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. अवघ्या विसाव्या वर्षी युवा गोलंदाजाने जगाचा निरोप घेतला आहे.

Cricket | युवा गोलंदाजाचं मैदानातच निधन, बॉलिंग रनअप दरम्यान जगाचा निरोप
Cricket
| Updated on: Jan 26, 2024 | 10:23 PM

मुंबई | क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. युवा खेळाडूचं सामन्यादरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता जम्मू काशमिरमधील युवा आणि नव्या दमाच्या गोलंदाजाने जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे या युवा गोलंदाजाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच क्रिकेट विश्वातही शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरही युवा खेळाडूच्या मृ्त्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेकदा सामन्यादरम्यान खेळाडूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारे या युवा गोलंदाजही मृत्यू पावलाय. मिळालेल्या माहितीनुसार 20 वर्षांच्या गोलंदाजाचा बॉलिंग दरम्यान रनअप घेतानाचा मृत्यू झाला. सुहैब यासिन असं या मृताचं नाव आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात ऑस्ट्रेलियाच्या फिल ह्यूज याचा मृत्यू झाला होता. तसेच भारताच्या रमन लांबा याचही अशाच प्रकारे निधन झालं होतं. क्रिकेट चाहते या दुर्देवी घटना अजूनही विसरु शकत नाही.

स्थानिक माध्यमांनुसार, सुहैब यासीन याचा मृत्यू शुक्रवारी बारामुल्ला येथील पट्टन स्थित हांजीवरा येथे सामन्यादरम्यान झाला. सुहैब बॉलिंगसाठी रनअप घेताना मैदानात कोसळला. सुहैब अचानक कोसळल्याने खेळ थांबवण्यात आला. खेळाडूंसह उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. क्षणाचा विलंब न लावता सुहैब याला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोवर उशीर झाला होता. डॉक्टरांनी सुहैब याचं निधन झाल्याचं जाहीर केलं.

युवा खेळाडूचं निधन

मृत्यूचं नक्की कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार, या युवा गोलंदाजाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी नोएडामध्येही क्रिकेट खेळताना एकाचा खेळपट्टीवर मृत्यू झाला. आता या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे.