AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला कोणाच्या दबावाखाली राहायचं नाही, बुमराहसोबतच्या वादानंतर मार्को यान्सिनची प्रतिक्रिया

जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार वळणावर असताना मैदानावर खेळाडूंमध्ये तणावही वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाचीच्या घटना घडल्या.

मला कोणाच्या दबावाखाली राहायचं नाही, बुमराहसोबतच्या वादानंतर मार्को यान्सिनची प्रतिक्रिया
Jasprit Bumrah, Marco Jansen
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 18, 2022 | 9:55 AM
Share

डरबन : जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार वळणावर असताना मैदानावर खेळाडूंमध्ये तणावही वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाचीच्या घटना घडल्या. डरबन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या रेसी वान डर डुसें यांच्यामधली शाब्दिक बाचाबाची मायक्रोफोनमुळे समजली. पंत आणि डुसें प्रमाणेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मार्को यान्सिनमध्येही (Marco Jansen) मैदानावर वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

दोघेही शांत स्वभावाचे खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून दोघे एकत्र खेळलेही आहेत. तरीसुद्धा मैदानावर बुमराह आणि यान्सिनमध्ये शाब्दिक वादावादी झाली. यान्सिन त्याचा अवघा दुसरा कसोटी सामना खेळतोय. पण त्याने आपल्या गोलंदाजीने भारताला दणके दिले. बाऊन्सर चेंडूंवरुन बुमराह आणि यान्सिनमध्ये वाद झाला. 54 व्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज यान्सिनने बुमराहवर बाऊन्सर चेंडूंचा मारा केला. यान्सिनचा तिसरा चेंडू बुमराहच्या खांद्याला लागला. त्यानंतर यान्सिनने चौथा चेंडूही बाऊंन्सरच टाकला. पण बुमराहने स्वत:ला वाचवलं. त्यानंतर यान्सिनने बुमराहला ठसन दिली व दोघांमध्ये काही बोलणे झाले.

यान्सिन रनअप घेण्यासाठी जात असताना, बुमराह पुढे येऊन काहीतरी बोलला. यान्सिन आणि बुमराह परस्परांच्या खूपच जवळ आले. दोघांची देहबोली आक्रमक होती. त्यावेळी वातावरण शांत करण्यासाठी अंपायरला मध्यस्थी करावी लागली. पंचांनी बुमराहला शांत राहण्यास सांगितले. यान्सिनच्या षटकानंतर रबाडाने सुद्धा बुमराहला बाऊन्सर गोलंदाजी केली. पण बुमराहने शानदार षटकार मारला. त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये उपस्थित संघाने टाळ्या वाजवून बुमराहचे कौतुक केले.

दरम्यान, या वादावर आता मार्को यान्सिनने प्रतिक्रिया दिली आहे. या 21 वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिका क्रिकेट (CSA) च्या ट्विटर हँडलवरून माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘मी आयपीएलमध्ये बुमराहसोबत खेळलो आहे आणि आम्ही चांगले मित्र आहोत. जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता, तेव्हा तुम्हाला इतरांनी दडपू नये असे वाटते. कधी कधी भावना मैदानात दिसतात.

आमच्या मनात एकमेकांबद्दल वाईट भावना नाही : मार्को

यान्सिन म्हणाला, “त्यानेदेखील (बुमराह) तशीच प्रतिक्रिया दिली आणि कोणाच्या मनात वाईट भावना नाही,” तिथले वातावरण असेच होते. देशासाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या दोन खेळाडूंमध्ये हे घडले. यान्सिन म्हणाला की, त्याच्याकडे अंतर्मुखी व्यक्तिमत्त्व आहे. तो म्हणाला, ‘मी मैदानाबाहेर थोडा अंतर्मुख आहे. पण मला सर्वात जास्त आवडणाऱ्या खेळाच्या मैदानावर व्यक्त व्हायचं आहे. मला खेळाची आवड आणि जोष दाखवायचा आहे.

कसोटी मालिकेत यश मिळवूनही यान्सिन आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाला हलक्यात घेत नाही. तो म्हणाला, “आम्ही कसोटी मालिकेतील कामगिरी पुढे नेण्यासाठी उत्सुक आहोत. पण आम्ही भारताला अजिबात कमी लेखत नाही आहोत. आम्हाला त्यांच्याशी स्पर्धा करायला आवडेल.” भारतीय संघ 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 5-1 ने जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

इतर बातम्या

Rahul Dravid: राहुल द्रविड कोच झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या? जसप्रीत बुमराह म्हणाला…

IPL 2022 ला आणखी एक झटका, इंग्लंडच्या एक मोठ्या ऑलराऊंडर प्लेयरने घेतली माघार

Vinod Kambli: वर्तनामुळे क्रिकेटमधल्या वाया गेलेल्या टॅलेंटची गोष्ट, मैदानापेक्षा बाहेरच्या गोष्टींचीच जास्त चर्चा

(Jasprit Bumrah and Me are friends, says Marco Jansen on heated moments with Indian pacer in IND vs SA test)

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!