AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या कोणासाठी आला आहेस…! जसप्रीत बुमराह भडकला, मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेटमधील गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र... तसा बुमराह मैदानात शांत असतो. पण मुंबईत परतल्यानंतर विमानतळावर एका कॅमेरामनवर चिडला. त्याचं कारणही तसंच आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

दुसऱ्या कोणासाठी आला आहेस...! जसप्रीत बुमराह भडकला, मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?
दुसऱ्या कोणासाठी आला आहेस...! जसप्रीत बुमराह भडकला, मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?Image Credit source: PTI
| Updated on: Oct 16, 2025 | 3:27 PM
Share

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली आहे. मात्र अजूनही जसप्रीत बुमराह काही तिथे गेला नाही. जसप्रीत बुमराह लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आल्याने तो इतर खेळाडूंसोबत प्रवास करू शकला नाही.  ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी काही दिवस आराम करणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराह मुंबईत परतला. पण शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा जसप्रीत यावेळी वेगळ्याच मूडमध्ये दिसला. मुंबई विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या कॅमेरामनवर चिडला. तसेच त्यांना तेथून जाण्यासही सांगितले. जसप्रीत बुमराहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जसप्रीत बुमराह विमानतळाबाहेर येतात त्याला कॅमेरामनने गराडा घातला. तसेच त्याच्या त्याच्या मार्गात अडथळे आणले. त्यामुळे तो फोटोग्राफर्सवर वैतागलेला दिसला. बुमराहने एक दोन वाक्यातच फोटोग्राफर्सचे कान टोचले. इतकंच काय तर जसप्रीत बुमराह म्हणाला की, मी कॅमेरामनला बोलवलंच नव्हतं.

जसप्रीत बुमराह रागाच्या भरात म्हणाला की, ‘मी तुम्हाला बोलवलंच नव्हते. तु्म्ही दुसऱ्या कोणासाठी आला आहेत. तो येणार असेल.’ बुमराहच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, संबंधित फोटोग्राफर हे दुसऱ्या कोणा सेलिब्रेटीची वाट पाहात होते. म्हणून त्याने त्यांना फटकारले. त्यानंतर एक कॅमेरामन म्हणाला की, ‘भावा, तू दिवाळीचा आमच्यासाठी बोनस आहे.’ कॅमेरामनच्या अशा बोलण्याने बुमराह अजून चिडला. त्याने उत्तर देत सांगितलं की, ‘अरे भाऊ, मला माझ्या गाडीकडे जाऊ दे.’ या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी जसप्रीत बुमराहला त्रास देणाऱ्यांना फटकारलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका संपली की 29 ऑक्टोबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. दरम्यान, जसप्रीत बुमराहची वेस्ट इंडिजविरुद्धची कामगिरी सरासरी राहिली. त्याने दोन सामन्यात एकूण 51.5 षटके टाकली आणि सात विकेट घेतल्या.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.