IND vs ENG: बुमराहला अप्रतिम कामगिरीचं फळ, ICC च्या खास पुरस्कारासाठी नामांकित

संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत उत्तम कामगिरी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चौथ्या कसोटीत 100 कसोटी विकेट्सही पूर्ण केल्या. त्याने भारतीय गोलंदाजीचा म्होरक्या म्हणून उत्तम कामगिरी निभावली आहे.

IND vs ENG: बुमराहला अप्रतिम कामगिरीचं फळ, ICC च्या खास पुरस्कारासाठी नामांकित
जसप्रीत बुमराह
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 12:25 PM

लंडन : भारताने इंग्लंडला (India vs England) त्यांच्याच भूमीत अर्थात ओव्हलच्या मैदानावर 157 धावांनी पराभूत केलं. 50 वर्षानंतर ओव्हलच्या मैदानात (Oval Test) मिळवलेल्या या विजयात सर्वच खेळाडूंचा वाटा होता. पण इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारताची गोलंदाजीची कमान सांभाळली ती यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah). बुमराहने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यात 14 विकेट घेतले असून लॉर्ड्सच्या कसोटीत फलंदाजीतही योगदान दिलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) बुमराहचा खास सन्मान करत आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ (ICC Player Of the Month) पुरस्कारासाठी त्याला नामांकित केलं आहे.

जसप्रीत बुमराहने ऑगस्ट महिन्यात इंग्लंडच्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्याने 3 कसोटी सामन्यात 14 विकेट्स पटकावल्या. यावेळी नॉटिंघम कसोटीच्या दुसऱ्या डावात तर  5 विकेट हॉलही मिळवला. विशेष म्हणजे बुमराहने फलंदाजीतही चुनूक दाखवली. नॉटिंघममध्ये 28 धावा केल्यानंतर लॉर्ड्समध्ये महत्त्वपूर्ण नाबाद 34 धावांची खेळी केली. त्याच्या शमी सोबतच्या या खेळीचं सर्व जगातून कौतुक झालं. या सर्व कामगिरीमुळेच बुमराहला या पुरस्कारासाठी नामांकित केलं गेलं आहे.

बुमराहचा नवा विक्रम

संपूर्ण मालिकेत उत्तम गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत एका विक्रमाला गवसणी घातली. या कसोटीत त्याने आपले 100 विकेट पूर्ण केले. ऑली पोप त्याचा 100 वा कसोटी बळी ठरला. विशेष म्हणजे सर्वात वेगवान 100 कसोटी विकेट घेणारा तो भारताचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने 25 कसोटीत 100 विकेट घेणाऱ्या कपिल देव यांना मागे टाकलं आहे. तर गोलंदाज म्हणून सर्वात जलद 100 कसोटी विकेट घेणारा बुमराह आठवा भारतीय असून रवीचंद्रन अश्विन आघाडीवर आहे, ज्याने 18 कसोटीत 100 विकेट घेतले आहेत.

रुट आणि आफ्रिदीही शर्यतीत

बुमराहसह या पुरस्कारासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदी यांनाही नामांकित केलं गेलं आहे. रुटने भारताविरुद्ध तीन सामन्यात तीन जबरदस्त शतक ठोकत 509 धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत त्याने संघाला एकहाती विजय मिळवून दिला. आयसीसीच्या कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर पोहोचणाऱ्या रुटला या पुरस्कारासाठी नामांकित केलं आङे. तर शाहीनने वेस्टइंडीज विरुद्ध गोलंदाजीमध्ये 2 कसोटी सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत.

इतर बातम्या

IND vs ENG: सामनावीर पुरस्कार मिळूनही रोहित म्हणतो खरा हिरो तर ‘हा’ खेळाडू, ओव्हल कसोटीनंतर रोहित शर्माच मत

IND vs ENG : रोहितचं शतक, शार्दुलची अष्टपैलू कामगिरी, भारताची इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत आघाडी

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

(Jasprit bumrah nominated for icc player of the month award for august after awsome performance in india vs england tests)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.