Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप टीममधून OUT झाल्यानंतर पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल

Jasprit Bumrah: फॅन्सच्या खतरनाक Reactions एकदा लिंकवर क्लिक करुन पहा

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप टीममधून OUT झाल्यानंतर पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल
bumrah-madhvan
Image Credit source: social media
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 29, 2022 | 7:23 PM

मुंबई: टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला झटका बसला आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर गेला आहे. बुमराहला बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास होतोय. त्यामुळे काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात तो खेळला नाही. आज दुपारी पीटीआयने जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली. यानंतर सोशल मीडियावर फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने React होत आहेत. टीम इंडियासाठी हा एक मोठा चिंतेचा विषय आहे.

मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल

टीम इंडियाच्या फॅन्सनी आता टी 20 वर्ल्ड कप विसरुन जावा, असं काही फॅन्सनी म्हटलं आहे. सर्वकाही संपलं, टाटा, बाय, बाय असं काही फॅन्सनी म्हटलय. जसप्रीत बुमराहच्या एग्झिट नंतर अनेक प्रकारचे मीम्स बनले आहेत. हे मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

जाडेजा आधी बाहेर गेला

वर्ल्ड कप सुरु होण्याच्या दोन आठवडे आधी टीम इंडियाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. रवींद्र जाडेजा आधी बाहेर गेला. आता जसप्रीत बुमराह बाहेर गेलाय. दोघेही प्लेइंग 11 भाग असणार होते. आता रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडीला त्यांची रिप्लेसमेंट शोधावी लागेल.

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

स्टँड बाय: श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, दीपक चाहर 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें