AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराह कोणाच्या प्रेमात वेडा झाला होता? पळून जाण्याची होती तयारी; अखेर खरं काय ते समोर आलं.

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आता इंग्लंड दौऱ्यात कसून सराव करत आहे. पहिल्या सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही हे स्पष्ट नाही. असं असताना जसप्रीत बुमराहचं एक गुपित मात्र उघड झालं आहे.

जसप्रीत बुमराह कोणाच्या प्रेमात वेडा झाला होता? पळून जाण्याची होती तयारी; अखेर खरं काय ते समोर आलं.
जसप्रीत बुमराह कोणाच्या प्रेमात वेडा झाला होता? पळून जाण्याची होती तयारी; अखेर खरं काय ते समोर आलं.Image Credit source: Visionhaus/Getty Images
| Updated on: Jun 27, 2025 | 3:47 PM
Share

जसप्रीत बुमराहचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे अनेक चाहते आहे. तसेच काही जण त्याच्या प्रेमातही पडले आहे. पण वेगवान गोलंदाज बुमराह एका मुलीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता. त्याच्याबाबतचा हा खुलासा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत त्याची पत्नी संजना गणेशन हीनेच गुपित उघड केलं आहे. संजनाने सांगितलं की, बुमराह एका मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्यासोबत पळून लग्न करण्याच्या तयारीत होता. जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स प्रेजेंटर संजना गणेशन यांचं लग्न मार्च 2021 मध्ये झालं होतं. लग्नाच्या चार वर्षानंतर संजनाने हा खुलासा केला आहे. बुमराह आणि संजना यांनी ‘हू इज द बॉस’ या हरभजन सिंह आणि गीत बसराच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघांनी अनेक खुलासे केले.

कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये संजनाने लग्नापूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. यात तिने बुमराहचं गुपित सांगितलं. संजनाने सांगितलं की बुमराह माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करण्यास तयार होता. यावर संजनाने त्याला सांगितलं की, ‘तू रन अप वर देखील पळत नाहीस, तर माझ्यासोबत काय पळशील?’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सध्या जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही असं दिसत आहे.

जसप्रीत बुमराह या मालिकेत फक्त तीन सामने खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यापैकी एक सामना लीड्सवरील हेडिंग्लेमध्ये खेळला. आता चार पैकी दोन सामन्यात खेळेल. जसप्रीत बुमराहची इंग्लंडमधील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्याने 9 कसोटी सामन्यात 42 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्मा आणि कपिल देवनंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. इशांत शर्माने 14 कसोटीत 48, तर कपिल देवने 13 कसोटीत 43 विकेट घेतल्या आहेत.  कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी जसप्रीत बुमराहला 2, तर इशांत शर्माचा विक्रम मोडण्यासाठी 7 विकेट्सची आवश्यकता आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा