AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket: सरफराज खानच्या जागी 25 वर्षीय खेळाडूची संघात अचानक एन्ट्री, झालं असं की…

Duleep Trophy: सरफराज खान याची भारतीय संघात साई सुदर्शनच्या जागी एन्ट्री झाली. त्यामुळे दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेत वेस्ट झोन संघात एक बदल झाला आहे. सरफराज खानच्या जागी 25 वर्षीय खेळाडूला संधी मिळाली आहे.

Cricket: सरफराज खानच्या जागी 25 वर्षीय खेळाडूची संघात अचानक एन्ट्री, झालं असं की...
Cricket: सरफराज खानच्या जागी 25 वर्षीय खेळाडूची संघात अचानक एन्ट्री, झालं असं की...Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2026 | 5:06 PM
Share

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दोन धक्के बसले. संघात निवड झालेले जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन हे दुखापतीमुळे बाद झाले. त्यामुळे बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खान यांची निवड झाली. सरफराज खान शेवटचा सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला संघात काही स्थान मिळालं नाही. आता दीड वर्षांनी त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं पुन्हा खुली झाली आहेत. असं असताना त्याची टीम इंडियात वर्णी लागली आणि 25 वर्षीय खेळाडूचं नशिब फळफळलं. कारण सरफराज खानमुळे दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन संघात एक जागा रिक्त झाली आहे.

सरफराजची जागा जय गोहिल घेणार

वेस्ट झोन आणि मुंबईचे मुख्य निवडकर्ते राजेश पवार यांनी स्पष्ट केलं की, सरफराज खानच्या जागी सौराष्ट्रच्या 25 वर्षीय युवा फलंदाज जय गोहिल यांची वेस्ट झोन संघात वर्णी लागली आहे. गोहिलची संघात निवड होण्यापूर्वी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत होता. रणजी ट्रॉफीत सौराष्ट्र संघासाठी त्याने चांगली कामगिरी केली होती. जय गोहिलने 2022-23 मध्ये सौराष्ट्रला रणजी ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. त्याने डेब्यू सिझनमध्ये 9 डावात 37 च्या सरासरीने 337 धावा केल्या होत्या. आता हार्विक देसाईनंतर गोहिल वेस्ट झोन संघात सहभागी झालेला दुसरा सौराष्ट्राचा खेळाडू आहे.

जय गोहिल याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत 12 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. त्यात त्याने 48 च्या सरासरीने एकूण 860 धावा केल्या आहे. इतकंच काय तर रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शतकं आणि चार अर्धशतकं आहे. आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोन संघाकडून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार आहे. वेस्ट झोनचा पहिला सामना 23 ऑगस्टला नॉर्थ झोनविरुद्ध होणार आहे.

दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन संघ :ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), शम्स मुलानी (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, मुशीर खान, तुषार देशपांडे, तनुश कोटियन, सिद्धार्थ देसाई, अतीत शेठ, पृथ्वी शॉ, शिवालिक शर्मा, मुकेश चौधरी, हार्विक देसाई (विकेटकीपर), जयमीत पटेल, उर्विल पटेल आणि जय गोहिल.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...