IND vs AUS : टीमला चॅम्पियन बनवण्याच फळ, 10 वर्षानंतर भारताच्या वनडे टीममध्ये मिळालं स्थान

IND vs AUS ODI Series : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सीरीजसाठी टीम जाहीर केली. या टीममध्ये एका खेळाडूच्या सिलेक्शनने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. या खेळाडूने अलीकडेच बऱ्याच वर्षानंतर टेस्ट टीममध्ये एंट्री केली होती.

IND vs AUS : टीमला चॅम्पियन बनवण्याच फळ, 10 वर्षानंतर भारताच्या वनडे टीममध्ये मिळालं स्थान
team india
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:46 AM

IND vs AUS ODI Series : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या सीनियर निवड समितीने रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सीरीजसाठी टीम जाहीर केली. या टीममध्ये एका खेळाडूच्या सिलेक्शनने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. या खेळाडूने अलीकडेच बऱ्याच वर्षानंतर टेस्ट टीममध्ये एंट्री केली होती. आता वनडे टीममध्येही बऱ्याच कालावधीनंतर समावेश झालाय. या खेळाडूच नाव आहे, जयदेव उनाडकट. वनडे टीममध्ये जयदेव उनाडकटची निवड होईल, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. पण निवड समितीने त्याची निवड केली आहे.

टेस्ट, वनडे दोन्ही टीममध्ये स्थान

उनाडकट 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला. त्यानंतर तो टीमच्या बाहेर गेला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे अखेर त्याला टेस्ट टीममध्ये स्थान मिळालं. बांग्लादेश दौऱ्यावर टेस्ट टीममध्ये त्याला स्थान मिळालं. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजसाठी सुद्धा त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. टेस्ट आणि वनडे दोन्ही टीमध्ये जयदेव उनाडकटचा समावेश केलाय.

10 वर्षानंतर मिळाली संधी

जयदेव उनाडकटने 10 वर्षानंतर भारताच्या वनडे टीममध्ये एंट्री केलीय. त्याने 21 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कोच्ची येथे शेवटचा वनडे सामना खेळला होता. मात्र त्यानंतर तो वनडे टीमच्या सुद्धा बाहेर गेला. उनाडकट या दरम्याान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करत होता. त्यामुळेच त्याला आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी टीममध्ये स्थान मिळालय. उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्राच्या टीमने दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच विजेतेपद मिळवलं. सौराष्ट्रच्या टीमने कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर बंगाल विरुद्ध विजय मिळवला.

देशातंर्गत क्रिकेटमध्ये कशी आहे उनाडकटची कामगिरी?

याआधी 2020 साली रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये सौराष्ट्र आणि बंगालची टीम आमने-सामने होती. त्यावेळी सौराष्ट्रने बंगालला पराभूत केलं होतं. त्यावेळी सुद्धा उनाडकट सौराष्ट्राचा कॅप्टन होता. त्यावर्षी फायनल मॅचमध्ये उनाडकटने एकूण नऊ विकेट काढल्या. 50 षटकांच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने 10 सामन्यात 19 विकेट काढल्या. या सीरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज होता. सौराष्ट्रच्या टीमने यावर्षी विजय हजारे ट्रॉफी सुद्धा जिंकली. गोलंदाजीत येणार वैविध्य

उनाडकटच्या समावेशामुळे टीममध्ये वैविध्य येणार आहे. कारण तो टीममधील एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाल्यास गोलंदाजीत वैविध्य येईल. उनाडकट भारतासाठी आतापर्यंत सात वनडे सामने खेळलाय. यात त्याने 8 विकेट घेतल्यात. करिअरमधील पहिला वनडे सामना तो 24 जुलै 2013 रोजी हरारेमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध खेळला होता.

Non Stop LIVE Update
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.