वैभव सूर्यवंशीचं मोठं गुपित जोफ्रा आर्चरला कळलं, आयपीएल 2026 स्पर्धा संपताच करणार खुलासा
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीला समोर पाहून नेमका टप्पा कुठे टाकावा? हा प्रश्न गोलंदाजांना पडतो. कारण 15 वर्षीय वैभवने दिग्गज गोलंदाजांना कात्रजचा घाट दाखवला आहे. वैभव सूर्यवंशीला कसं रोखायचा हा प्रश्न आहे? जोफ्रा आर्चरने या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाजांना वैभव सूर्यवंशी आपल्या संघात असल्याचं सर्वात जास्त आनंद झाला असेल. कारण प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वैभव सूर्यवंशी तुटून पडला आहे. दिग्गज गोलंदाजांना त्याने आक्रमकपणे झोडलं आहे. या स्पर्धेत पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि कागिसो रबाडासारखा गोलंदाजांनाही सोडलं नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना वैभव आपल्या संघात असल्याचं सुख आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीला रोखायचं कसं? हा प्रश्नही आहे. हा प्रश्न आता प्रत्येक गोलंदाजाला पडला आहे. हाच प्रश्न संघ सहकारी असलेल्या जोफ्रा आर्चरला विचारला गेला. तेव्हा त्याने हे गुपित स्पर्धा संपेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर एकाच संघात आहेत. त्यामुळे यो दोघांचा मैदानात सामना होत नाही. पण नेट्समध्ये आमनेसामने येतात. तेव्हा जोफ्रा आर्चर वैभव सूर्यवंशीविरुद्ध कशा पद्धतीची गोलंदाजी करतो? असा प्रश्न ब्रॉडकास्टवर आर्चरला विचारला गेला. तेव्हा जोफ्रा आर्चरने सांगितलं की, कधी कधी वैभवला नेट्समध्ये गोलंदाजी करतो. पण वैभव सूर्यवंशीला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतो हे मात्र सांगण्यास नकार दिला. आयपीएल स्पर्धा संपल्यानंत याबाबत खुलासा करेल असं त्याने सांगितलं. त्यामुळे आर्चर काही तरी लपवत आहे असं त्याच्या विधानावरून दिसून येत आहे. आर्चरने नेट्समध्ये वैभवला अडचणीत आणलं आहे का? की इंग्लंडच्या या गोलंदाजाची स्थितीही इतर गोलंदाजांप्रमाणे आहे. आता त्याने उत्तर गुलदस्त्यात ठेवल्याने उत्सुकता वाढली आहे.
आयपीएल स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ घोंघावलं. त्याने फक्त 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 12 षटकार मारले. तसेच समोर येईल त्या गोलंदाजाला धू धू धुतला. आता वैभव सूर्यवंशी क्वॉलिफायर 2 मध्ये कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी लढत देणार आहे.