IND vs ENG : जोस बटलरला क्लिन स्वीप जिव्हारी, पराभवानंतर शुबमनचं नाव घेत थेटच म्हणाला…
Jos Buttler On Shubman Gill IND vs ENG 3rd Odi : टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 142 धावांनी लोळवलं. टीम इंडियाने यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. इंग्लंडला क्लिन स्वीप मिळाल्यानंतर कर्णधार जोस बटलरने शुबमन गिल याचं नाव घेतलं. पाहा काय म्हणाला?

टीम इंडियाने बुधवारी 12 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 142 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 357 धावांचं अवघड आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडला जेमतेम 200 पार मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 34.2 ओव्हरमध्ये 214 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं. टीम इंडियाचा उपकर्णधार सलामीवीर शुबमन गिल हा या विजयाचा हिरो ठरला. शुबमन गिल याने 112 धावांची खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने लाजिरवाण्या मालिका पराभवानंतर शुबमन गिलचं नाव घेत काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
कॅप्टन जोस बटलर पराभवानंतर काय म्हणाला?
“आमच्यासाठी हा संपूर्ण भारत दौरा एकसारखाच राहिला आणि काहीच बदललं नाही. आमच्या फलंदाजीत कोणताही बदल आला नाही. आम्हाला एका सर्वोत्तम संघाने पराभूत केलंय. आम्ही खास बॅटिंग करु शकलो नाहीत. आम्हाला आणखी चांगली रणनिती आखायला हवी होती. त्यांनी (टीम इंडिया) अवघड आव्हान ठेवलं. शुबमन गिल याने चांगली खेळी केली. आमची सुरुवात चांगली झाली मात्र आमची स्थिती पहिल्यासारखीच होती. आम्हाला फार वेळ टिकून राहून बॅटिंग करण्यासाठी पद्धत शोधायला लागेल. आम्ही अशा सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळत होतो ज्यांनी आम्हाला सातत्याने आव्हान दिलंय”, असं बटलरने म्हटलं.
गिलचा शतकी झंझावात
दरम्यान शुबमन गिल याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 356 धावा केल्या. टीम इंडियासाठी शुबमनने 102 बॉलमध्ये 14 आणि 3 सिक्ससह 112 रन्स केल्या. तर विराटने 52 धावा जोडल्या. तसेच श्रेयस अय्यर याने 64 चेंडूमध्ये 78 धावांची खेळी केली. केएल राहुलने 40 धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडसाठी आदिल रशीदने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
बटलरची क्लिन स्वीपनंतर प्रतिक्रिया
🗣️ “We threatened through the whole tour but haven’t been good enough”
Jos Buttler reflects after a heavy series defeat at the hands of India.
📺 Watch #INDvENG on @tntsports & @discoveryplusUK pic.twitter.com/qawfMXytrL
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) February 12, 2025
प्रत्युत्तरात इंग्लंडकडून एकाही फलंदाजाला 50 धावाही करता आल्या नाहीत. टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर इंग्लंडचं 214 रन्सवर पॅकअप झालं. टीम इंडियासाठी अर्शदीप सिंह, हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस एटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद