KKR vs RCB : 20 व्या ओव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, 3 सिक्स खालल्यानंतर स्टार्कने केकेआरला जिंकवलं

KKR vs RCB IPL 2024 : आरसीबीला विजयासाठी शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 21 धावांची गरज होती. कर्ण शर्माने 3 सिक्स ठोकून सामन्यात रंगत आणली. मात्र अखेर केकेआरचा 1 धावेने विजय झाला.

KKR vs RCB : 20 व्या ओव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, 3 सिक्स खालल्यानंतर स्टार्कने केकेआरला जिंकवलं
karn sharma and mitchell starc,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 9:06 PM

क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात पैसा वसूल थरार पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर शेवटच्या बॉलवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. केकेआरने विजयासाठी दिलेल्या 223 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 19 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 202 धावा केल्या होत्या. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 21 धावांची गरज होती. आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि कर्ण शर्मा ही जोडी मैदानात होती. तर केकेआरने 20 वी ओव्हर टाकायची जबाबदारी ही आयपीएलमधील सर्वात महागड्या मिचेल स्टार्क याला दिली.

कर्ण शर्मा याने मिचेल स्टार्कची धुलाई केली. कर्ण शर्माने स्टार्कच्या ओव्हरमधील पहिल्या 4 बॉलमध्ये 3 सिक्स ठोकून आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. तर दुसऱ्या बाजूला मिचेल स्टार्क केकेआरच्या पराभवाचा व्हिलन ठरलेला. मात्र पुढच्याच म्हणजेच पाचव्या बॉलवर फासे उलटे पडले. कर्ण शर्माला स्टार्कने आपल्या बॉलिंगवर कॅच आऊट केलं आणि सामना केकेआरच्या बाजूने फिरला. त्यानंतर सहाव्या आणि अखेरच्या बॉलवर केकेआरला विजयासाठी 3 धावांची गरज होती. तेव्हा लॉकी फर्ग्यूसन दुसरी धाव घेताना रन आऊट झाला. केकेआरने अशाप्रकारे हा सामना 1 धावेने जिंकला. या निमित्ताने शेवटच्या ओव्हरमध्ये काय काय झालं, हे जाणून घेऊया.

थरारक सामन्यात केकेआर विजयी

पहिला बॉल : मिचेल स्टार्कसचं कर्ण शर्मा याच्याडून सिक्स ठोकून स्वागत. वाईड यॉर्करवर कर्णचा डीप पॉइंटवर खणखणीत सिक्स.

दुसरा बॉल : कर्ण शर्मा थोडक्यात बचावला. बॉल बॅटला लागून विकेटकीपरच्या दिशेने गेला. मात्र रीव्हीव्यूने वाचवलं.

तिसरा बॉल : कर्ण शर्माने तिसऱ्या बॉलवर ऑफ स्टंपच्या बाहेर फुल बॉलवर येत सिक्स ठोकला.

चौथा बॉल : कर्णने पुन्हा सिक्स ठोकला. पहिल्या 4 पैकी 3 बॉलमध्ये कर्णने सिक्स ठोकल्याने विराट कोहली आनंदी झाला. मात्र हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही.

पाचवा बॉल : कर्ण शर्माने ऑफ स्टंपच्या बाहेरील फुलटॉस बॉल मारला आणि मिचेल स्टार्कने कॅच घेतला. कर्ण शर्मा आऊट झाला आणि आरसीबी पुन्हा बॅकफुटवर गेली.

सहावा आणि शेवटचा बॉल : आरसीबीला शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज होती. लॉकी फर्ग्यूसनने डीप कव्हरमध्ये ड्राईव्ह मारला. दुसरी रन घेण्याच्या प्रयत्न लॉकी रन आऊट झाला आणि आरसीबाचा 1 धावेने पराभव झाला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.