AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs RCB : श्रेयसकडून केकेआरच्या सनसनाटी विजयाचं श्रेय ‘या’ एकट्याला, काय म्हणाला?

KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 222 धावा करुनही अखेरच्या चेंडूवर 1 रननी विजयी झाली. आरसीबीवर 1 रनने मात केल्यानंतर श्रेयस अय्यरने विजयाचं श्रेय एकट्या खेळाडूला दिलं.

KKR vs RCB : श्रेयसकडून केकेआरच्या सनसनाटी विजयाचं श्रेय 'या' एकट्याला, काय म्हणाला?
shreyas iyer kkr captain ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 21, 2024 | 11:22 PM
Share

फाफ डु प्लेसीस याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पदरी आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चिवट झुंज देऊनही अपयश आलं. कोलकाता नाईट रायर्डर्सने आरसीबीसमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची विशेष सुरुवात झाली नाही. मात्र त्यानंतर रजत पाटीदार आणि विल जॅक्स या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे आरसीबीला जोरदार लढत देता आली. मात्र जॅक्स आणि पाटीदार हे दोघे आऊट झाल्यानंतर आरसीबीने झटपट विकेट टाकले.

त्यानंतर दिनेश कार्तिक आणि सुयश प्रभुदेसाई या दोघांनी सातव्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी करुन सामन्यात आरसीबीला कायम ठेवलं. मात्र त्यांनतंर प्रभुदेसाई आणि कार्तिक दोघे आऊट झाले. त्यामुळे पुन्हा केकेआरने कमबॅक केल. आता आरसीबीला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावांची गरज होती. तेव्हा मिचेल स्टार्क शेवटची ओव्हर टाकायला आला. तर मोहम्मद सिराज आणि कर्ण शर्मा ही जोडी मैदानात होती.

मिचेल स्टार्कच्या ओव्हरमधील पहिल्या 4 बॉलमध्ये 3 सिक्स ठोकले. त्यानंतर कर्ण आऊट झाला. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 1 बॉलमध्ये 3 धावांची गरज होती. तेव्हा लॉकी फर्ग्यूसन याने पहिली धाव पूर्ण करुन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रन आऊट झाला. अशाप्रकारे आरसीबीचा डाव हा 221 धावांवर आटोपला आणि केकेआरने 1 रनने सामना जिंकला. या थरारक विजयानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने विजयाचं श्रेय कुणाला दिलं आणि मिचेल स्टार्क याच्याबाबत काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

“अशा परिस्थितीत तुम्ही पूर्णपणे थकता. शांत राहणं फार अवघड होतं, मात्र मी आनंदी आहे. आम्हाला 2 पॉइंट्स मिळाले आणि ते महत्तवाचे आहेत. दबाव सहन करणं अवघड असतं. प्रत्येकाला जबाबदारी घ्यायची असते. आंद्रे रसेलने 20 बॉलमध्ये 27 धावा केल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या. श्रेयसने सामना आमच्या बाजूने झुकवला. टीममध्ये अशा खेळाडूंची गरज आहे”, असं श्रेयस म्हणाला.

“हा गंमतशीर खेळ आहे. विजयासाठी 6 बॉलमध्ये 18 धावा पाहिजे असताना बॉलरवर दबाव असतो. एका सिक्सने सामन्याचं चित्र बदलतं. शांत राहून फलंदाजाच्या चुकीची प्रतिक्षा करणं हे गरजेचं होतं”, असं म्हणत श्रेयसने मिचेल स्टार्कचा बचाव केला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....