AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSXI vs IND : दीड वर्षानंतर केएल राहुलचं शतक, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केली कमाल

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी सराव म्हणून भारतीय संघ इंग्लंडच्या काउंटी XI संघासोबत डरहम येथे सराव सामना खेळत आहे.

CSXI vs IND : दीड वर्षानंतर केएल राहुलचं शतक, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केली कमाल
के एल राहुल
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 10:10 AM
Share

डरहम : भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये काउंटी XI (County Select XI) संघासोबत सराव सामना खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळण्यापूर्वी सराव होण्याकरीता हा सामना खेळवला जात आहे. यावेळी दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे महत्त्वाचे फलंदाज सामन्यात नसल्याने भारताची सुरुवातीची फळी फेल होताना दिसत होती. पण त्याचवेळेस बदली यष्टीरक्षक म्हणून आलेल्या  केएल राहुलने (KL Rahul) अप्रतिम शतक ठोकत सामन्यात भारताला एक चांगली आघाडी मिळवून दिली आहे.

राहुलने 149 चेंडूत 11 चौकार आणि एक षटकार ठोकत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले 15 वे शतक ठोकले. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची (Team India) 67 धावांवर तीन बाद अशी परिस्थिती झाली असताना राहुल मैदानात आला. रवींद्र जाडेजासोबत मिळून शतकी भागिदारी करत राहुलने आपले शतक पूर्ण केले. कठीण वेळेत संयमी खेळी करत राहुलने केलेले हे शतक भारताला पहिल्या दिवशी एक चांगली आघाडी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरले.

अशी मिळाली संघात जागा

भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंतची (Rishabh Pant) विकेटकीपर म्हणून जागा निश्चित झाली होती. पण नुकतीच त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो विश्रांती करत असून दुसरा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा (Wridhiman Saha) हाही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात आहे. त्यामुळे तिसरा पर्याय असणाऱ्या राहुलला या सराव सामन्यात संधी देण्यात आली.

इंग्लंडच्या दौऱ्यात मिळू शकते एन्ट्री

केएल राहुल मार्च, 2020 मध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. कर्नाटक संघाकडून तो रणजी ट्रॉफीमध्ये हा सामना खेळला होता. तर भारतीय संघाचा विचार करता राहुलला सप्टेंबर, 2019 मध्ये वेस्ट इंडीजच्या दौऱ्यात संघात जागा मिळाली होती. पण त्यानंतर खराब फॉर्ममुळे तो कसोटी संघातून बाहेर गेला होता. मात्र या धमाकेदार कामगिरीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात पुन्हा स्थान मिळू शकते. याचे कारण सलामीवीर शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे राहुलला एक सलामीवीर म्हणून संघात जागा मिळू शकते.

राहुलची कसोटी कारकिर्द

राहुलने आतापर्यंत टीम इंडियाकडून 36 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 34.58 च्या सरासरीने 2 हजार 6 रन्स करत 5 शतक  आणि 11 अर्धशतक ठोकले आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 78  सामन्यात 46.04 च्या सरासरीने 5 हजार 802 रन्स केले आहेत.

हे ही वाचा

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

CSXI vs IND, Other Test Live Streaming: विराटची टोळी खेळणार पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

(KL rahul hits Century in India vs Count xi Practice test match at durham)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान