AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : केएल राहुलचा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा कारनामा, इंग्लंड विरुद्ध धमाका

KL Rahul England vs India 1st Test : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खास कामगिरी केली आहे. केएल अशी कामगिरी करणारा 17 वा भारतीय ठरला आहे.

ENG vs IND : केएल राहुलचा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा कारनामा, इंग्लंड विरुद्ध धमाका
KL Rahul 1000 Test Runs Against EnglandImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 23, 2025 | 12:34 AM
Share

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत या सामन्यात 3 दिवसांचा खेळ झाला आहे. दोन्ही संघ तिसऱ्या दिवसानंतर सामन्यात बरोबरीत आहेत. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 90 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने अशाप्रकारे एकूण 96 धावांची आघाडी मिळवली आहे. केएल राहुल 47 धावांवर नाबाद आहे. तर कर्णधार शुबमन गिल 6 धावा करुन मैदानात आहे. केएलने या खेळी दरम्यान खास कामगिरी केली. केएलने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 1 हजार धावा पूर्ण केल्या.

केएल राहुल याने कायमच इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. केएलने इंग्लंड विरुद्ध 14 सामन्यांमध्ये 26 डावांमध्ये 41 च्या सरासरीने 1 हजार 44 धावा केल्या आहेत. केएलने इंग्लंड विरुद्ध कसोटीत 3 शतकं तर 2 अर्धशतक झळकावली आहेत. तसेच केएल इंग्लंड विरुद्ध कसोटीत 1 हजार धावा करणारा 17 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच केएलची ही कोणत्या एका संघाविरुद्ध 1 हजार धावा करण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. केएलने इंग्लंडनंतर कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.

इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखलं

लीड्समध्ये तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने शानदार कामगिरी केली. बुमराहने 83 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने घेतलेल्या या 5 विकेट्समुळे टीम इंडिया इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरली. इंग्लंडला भारताच्या 471 च्या प्रत्युत्तरात 465 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे टीम इंडियाला नाममात्र का होईना पण 6 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून ओली पोप याने सर्वाधिक 106 रन्स केल्या. तर हॅरी ब्रूक याने 99 धावा केल्या. तर टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 90 धाला केल्या. भारताने अशाप्रकारे एकूण 96 धावांची आघाडी घेतली.

केएलच्या इंग्लंड विरुद्ध 1 हजार धावा

टीम इंडियाची सेकंड इनिंग

भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांच्या रुपात विकेट्स गमावल्या. पहिल्या डावात शतक करणारा यशस्वी दुसऱ्या डावात मोठी खेळी करु शकला नाही. यशस्वी दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. यशस्वीने 11 चेंडूत 4 धावा केल्या. तर पदार्पणातील पहिल्या डावात झिरोवर आऊट होणाऱ्या साई सुदर्शन याने दुसऱ्या डावात खातं उघडलं. साईने केएलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 66 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानतंर साई 48 बॉलमध्ये 4 फोरसह 30 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे केएल आणि शुबमनवर भारताला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.