AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : चेन्नईमध्ये टीम इंडिया कशी चीतपट झाली? समजून घ्या चार पॉइंट्समधून

IND vs AUS 3rd ODI : मायदेशात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या टीम इंडियाला हरवण खूप कठीण होतं. मग ऑस्ट्रेलियाने हे साध्य कसं केलं? टीम इंडियाने जिंकण्याचा डाव असा गमावला.

IND vs AUS : चेन्नईमध्ये टीम इंडिया कशी चीतपट झाली? समजून घ्या चार पॉइंट्समधून
ind vs ausImage Credit source: BCCI
| Updated on: Mar 23, 2023 | 8:24 AM
Share

IND vs AUS 3rd ODI : भारतीय टीमला मायदेशातच मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. टीम इंडियाने आपल्याच घरात मॅचच नाही, तर सीरीजही गमावली. ऑस्ट्रेलियाने बुधवारी तीन मॅचच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियावर 2-1 असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने सीरीजच्या अखेरच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने मुंबईतला पहिला सामना गमावला होता. मुंबईतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टनम आणि चेन्नई या दोन वनडेमध्ये सलग विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर कसा विजय मिळवला, ते चार पॉइंट्समधून समजून घ्या.

  1. टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर एकवेळ ऑस्ट्रेलियाची स्थिती 7/203 होती. ऑस्ट्रेलियन टीम लवकर ऑलआऊट होईल, असं सर्वांना वाटत होतं. पण त्यांच्या लोअर ऑर्डरमधील बॅट्समननी चांगली फलंदाजी केली. शेवटच्या तीन विकेटसाठी 66 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम सन्मानजक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली.
  2. ओपनर शुभमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्माने टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली होती. त्यांच्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला. पण भारताकडून मोठी भागीदारी होऊ शकली नाही. त्याची किंमत टीम इंडियाला सीरीज गमावून चुकवावी लागली.
  3. भारतीय बॅट्समन्सनी आणखी एक चूक केली. खराब शॉट सिलेक्शनमुळे त्यांनी आपल्या विकेट गमावल्या. केएल राहुल आणि हाफ सेंच्युरी झळकवणारा विराट कोहील चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे आऊट झाले. त्याची किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली.
  4. भारतीय खेळाडूंना पुन्हा एकाद ऑस्ट्रेलियन स्पिनर्सनी हैराण केलं. ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झम्पाने भारताच्या चार बॅट्समनने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यामुळे पुन्हा एकदा भारतीय फलंदाज स्पिनर्सना नीट खेळू शकत नाहीत, हे स्पष्ट झालं.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.