AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH :…जर असं झालं तर कोलकाता नाईट रायडर्स अंतिम फेरीत! जाणून घ्या आयपीएल स्पर्धेतील नियम

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला क्वॉलिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. पण कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक जमेची बाजू आहे. या सामन्यात काहीही न करता थेट फायनल गाठण्याची संधी आहे. कशी ते समजून घ्या

KKR vs SRH :...जर असं झालं तर कोलकाता नाईट रायडर्स अंतिम फेरीत! जाणून घ्या आयपीएल स्पर्धेतील नियम
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 20, 2024 | 9:20 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील जेतेपदाचा मानकरी कोण याची उत्सुकता आता आणखी ताणली गेली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यापैकी एक संघ जेतेपद मिळवणार हे आता निश्चित झालं आहे. या चार संघांमध्ये आता जेतेपदाची चुरस असणार आहे. दरम्यान पहिला क्वॉलिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 21 मे रोजी होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. तसेच पराभूत झालेला संघ एलिमिनेटर विजेत्या संघांशी दुसऱ्या क्वॉलिफायर फेरीत दोन हात करणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक जमेची बाजू आहे. आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफचा एक नियम कोलकाता नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडणार आहे. काय आहे हा नियम आणि कोलकाता नाईट रायडर्सला कसा होईल फायदा ते जाणून घेऊयात

आयपीएल स्पर्धेच्या नियमानुसार कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना टाय झाला तर सुपर ओव्हरमध्ये निकाल जाईल. पण सुपर ओव्हरमध्येही हा सामना टाय झाला तर मात्र हा कोलकाता नाईट रायडर्सला फायदा होईल. कारण गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. जर या सामन्यात असं काही झालं तर शाहरुख खानच्या मालकीचा संघ अंतिम फेरी गाठेल.

दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तीन सामने रद्द करण्याची वेळ आली आहे. गुजरातचे दोन आणि राजस्थानच्या एका सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामने रद्द करण्याची वेळ आली. पण प्लेऑफमध्ये असं काही झालं तर निराश होण्याची गरज नाही. आयपीएल प्लेऑफसाठी राखीव दिवस ठेवले गेले आहेत. तसेच सामन्यावेळी 2 तासांचा अतिरिक्त वेळही असणार आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी षटकं कमी करून त्याच दिवशी सामना संपण्यासाठी प्रयत्न असेल. तसं झालं नाही तर दुसऱ्या दिवशी सामना होईल.

राखीव दिवशीही सामना पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही. तर मात्र कोलकाता नाईट रायडर्सला याचा थेट फायदा होईल. कारण गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात हैदराबाद आणि आरसीबी समोरासमोर आली आणि असंच काहीसं झालं तर मग हैदराबाद अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानवावर आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.