AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 2nd ODI: मॅच जिंकूनही कुलदीप यादवला ड्रेसिंग रुममध्ये का सुनावलं?

कुलदीप यादवने फ्रि हिटवर मारलेल्या एका शॉटबद्दल ड्रेसिंग रुममध्ये त्याला काही गोष्टी बोलण्यात आल्या. "मी आता याच्यावर काम करीन. संधी मिळेल, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल" असं कुलदीप चहलला म्हणाला.

IND vs SL 2nd ODI: मॅच जिंकूनही कुलदीप यादवला ड्रेसिंग रुममध्ये का सुनावलं?
kuldeep yadav Image Credit source: PTI
| Updated on: Jan 13, 2023 | 1:37 PM
Share

कोलकाता: कुलदीप यादवने पुन्हा एकदा त्याच्या फिरकीने, तो मोठा मॅचविनर असल्याच सिद्ध केलय. कोलकाता वनडेमध्ये कुलदीप यादवला युजवेंद्र चहलच्या जागी संधी मिळाली. या खेळाडूने आपल्या फिरकीने श्रीलंकन टीमला धक्का दिला. कुलदीप यादवने 10 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन 3 विकेट काढल्या. कुलदीप यादवला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. सामना संपल्यानंतर कुलदीप यादवने युजवेंद्र चहलसोबत चर्चा केली. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआय टीव्हीने पोस्ट केलाय. कुलदीप यादवने या व्हिडिओत, ड्रेसिंग रुममध्ये त्याला काही गोष्टी सुनावण्यात आल्याचा खुलासा केला.

कशावरुन कुलदीपला सुनावलं

कुलदीप यादवने फ्रि हिटवर मारलेल्या एका शॉटबद्दल ड्रेसिंग रुममध्ये त्याला काही गोष्टी बोलण्यात आल्या. “फ्रि हिटवर मी कट मारुन फिल्डरच्या डोक्यावर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सरळ हातामध्ये गेला. यासाठी मला ड्रेसिंग रुममध्ये बरच काही बोललं गेलं. मी आता याच्यावर काम करीन. संधी मिळेल, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल” असं कुलदीप चहलला म्हणाला.

कोलकाताच्या विकेटवर कुलदीपने कशी गोलंदाजी केली?

कुलदीप यादवने सांगितलं की, “कोलकाता वनडेसाठी त्याने जास्त काही प्लानिंग केलं नव्हतं. मी जास्त प्लान केलं नव्हतं” “स्पिनर्ससाठी कोलकाताची विकेट फार चांगली नसेत, कारण चेंडू बॅटवर येतो. मी गुड लेंग्थवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. विकेट टू विकेट गोलंदाजीचा प्रयत्न केला. विकेटच्यामध्ये चेंडू टाकून चेंडू आता आणि बाहेर आणण्याचा प्रयत्न केला” असं कुलदीपने सांगितलं.

कुलदीप यादवने बदलली मानसिकता

कुलदीप यादवने त्याची मानसिकता बदलल्याच सांगितलं. “आधी मी विकेट घेण्याचा, चांगलं प्रदर्शन करण्याचा विचार करायचो. पण आता मी फक्त गोलंदाजी चांगली करायची आहे, एवढाच विचार करतो. कमीत कमी खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो” असं कुलदीप म्हणाला. “शनाकाला बाद करणं हा माझा फेव्हरेट विकेट होता. शनाका चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टीम मीटिंगमध्ये शनाकाला कसं बाद करायच, त्याबद्दल चर्चा झाली.शनाकाला बाद केल्यामुळे मी निश्चित आनंदी आहे” असं कुलदीपने सांगितलं. युजवेंद्र चहलच कौतुक

युजवेंद्र चहलने मॅचच्या आधी टीप्स दिल्याच कुलदीपने सांगितलं. “मॅचच्याआधी तुम्ही दिलेल्या टिप्स उपयोगाला आल्या. टेस्ट फॉर्मेटमधून मी वनडे खेळायला आलो होतो. तू सतत टी 20 आणि वनडेमध्ये खेळत होता. त्यामुळे तू दिलेला सल्ला उपयोगाला आला” असं कुलदीप म्हणाला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं