AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: मॅचविनर Kuldeep Yadav ला तिसऱ्या वनडेसाठी टीममधून बाहेर करणार?

IND vs SL: कुलदीप दुसऱ्या वनडेमधील विजयाचा हिरो आहे. पण फॅन्स, कुलदीपला बाहेर बसणार का? हा प्रश्न विचारतायत त्यामागे एक कारण आहे.

IND vs SL: मॅचविनर Kuldeep Yadav ला तिसऱ्या वनडेसाठी टीममधून बाहेर करणार?
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 13, 2023 | 9:27 AM
Share

IND vs SL 3RD ODI Match: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या वनडे सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात 4 विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये चायनामन बॉलर कुलदीप यादव टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. युजवेंद्र चहलला दुखापत झाल्यामुळे या मॅचमध्ये कुलदीप यादवला संधी मिळाली होती. कुलदीप यादवने मिळालेल्या संधीच पुरेपूर सोन केलं. तो ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला. इतका शानदार परफॉर्मन्स करुनही कदाचित कुलदीपला पुढच्या मॅचमध्ये संधी मिळणार नाही, असं बोललं जातय. त्यामागे काय कारण आहे, ते जाणून घ्या.

कुलदीपला बाहेर करतील, असं फॅन्सना का वाटतय?

कुलदीप यादवने काल श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅचमध्ये 10 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 51 धावा देऊन 3 विकेट काढल्या. इतकं शानदार खेळूनही कुलदीपला तिसऱ्या मॅचमध्ये संधी मिळणार नाही, असं फॅन्सच म्हणणं आहे. कुलदीपने बांग्लादेश दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत कमाल केली होती. त्याने 8 विकेट काढल्या होत्या. त्यासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅचचा’ पुरस्कार मिळाला. पण पुढच्याच दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला ड्रॉप करण्यात आलं. त्यामुळे टीम मॅनेजमेंट पुन्हा असं करु शकते, असं फॅन्सच म्हणणं आहे.

फॅन्सनी टीम मॅनेजमेंटवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

दुसऱ्या वनडेत शानदार खेळ दाखवल्यानंतर कुलदीप टि्वटरवर ट्रेंड होऊ लागला. फॅन्सनी टीम मॅनेजमेंटला ट्रोल केलं. “दुसऱ्या वनडेत कुलदीप यादव तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, आता तिसऱ्या वनडेत ड्रॉप होण्यासाठी तयार राहा” असं एका युजरने म्हटलं होतं. दुसऱ्या एका युजरने म्हटलं होतं की, “कुलदीपच जीवन असंच आहे, रोज उठ, चांगल खेळ, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवं आणि ड्रॉप हो” अशी आहे कुलदीपची कामगिरी

27 वर्षाचा कुलदीप यादव आतार्यंत भारतासाठी 8 टेस्ट, 74 वनडे आणि 25 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. त्याने टेस्टमध्ये 34, वनडेत 122 आणि टी 20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये एकूण 44 विकेट घेतलेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 126 विकेट आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या बळावर 34 सामन्यात 874 धावा केल्या आहेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...