AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धु, धु, धुतलं ‘त्याने’ 3 सामन्यांची कसर एका मॅच मध्ये भरुन काढली, गोलंदाजांची लावली वाट

कॅरेबियाई प्रीमियर लीग स्पर्धा सुरु झाली आहे. वेस्ट इंडिजच्या (West Indies) क्रिकेटपटूंची आक्रमक फटकेबाजी या स्पर्धेत पहायला मिळतेय.

धु, धु, धुतलं 'त्याने' 3 सामन्यांची कसर एका मॅच मध्ये भरुन काढली, गोलंदाजांची लावली वाट
kyle mayersImage Credit source: twitter
| Updated on: Sep 02, 2022 | 12:35 PM
Share

मुंबई: कॅरेबियाई प्रीमियर लीग स्पर्धा सुरु झाली आहे. वेस्ट इंडिजच्या (West Indies) क्रिकेटपटूंची आक्रमक फटकेबाजी या स्पर्धेत पहायला मिळतेय. एक सप्टेंबरला सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियोट्स आणि बारबाडोस रॉयल्स मध्ये सामना खेळला गेला. बारबाडोसने हा सामना जिंकला. बारबाडोससाठी ( barbados royals) या सामन्यात विजय सोपा नव्हता. पण एका फलंदाजाने हे काम सोपं केलं. या इनिंग सोबत या खेळाडूने या सीजनमधील पहिल अर्धशतकही झळकावलं.

काइल मायेर्सची बॅट तळपली

प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्सने आठ विकेट गमावून 149 धावा केल्या. बारबाडोसच्या टीमने तीन विकेट गमावून 15.1 षटकात हे लक्ष्य गाठलं. बारबाडोसच्या या विजयात काइल मायेर्सची बॅट तळपली. आतापर्यंत त्याची बॅट शांत होती. काइल मायेर्सने 11 चेंडू बाकी राखून विजय मिळवला. पावसामुळे हा सामना 17 षटकांचा करण्यात आला होता.

जोरदार फटकेबाजी केली

17 ओव्हर्स मध्ये 150 धावांचे लक्ष्य सोपे नव्हते. समोर ब्राव्हो, शेल्डन कॉटरेल, ड्वेन प्रीटोरियस आणि अकिला धनंजय सारखे गोलंदाज होते. मायेर्सने या सगळ्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने खोऱ्याने धावा वसूल केल्या. मायेर्सने 46 चेंडूत 73 धावा फटकावल्या. संघ विजयाच्या समीप पोहोचलेला असताना, मायेर्स आऊट झाला. मायेर्सची विकेट पडली, त्यावेळी संघाची धावसंख्या 145 होती. 158.69 च्या स्ट्राइक रेटने त्याने धावा केल्या. रखीम कोर्नावेलने 39 धावा केल्या. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मायेर्स याआधी तीन सामने खेळला होता. तीन सामन्यात त्याने एकही अर्धशतक फटकावलं नव्हतं.

Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन