AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी सीएसकेच्या माजी खेळाडूने ऋषभ पंतच्या लखनौ संघाची लाज काढली, म्हणाला..

आयपीएल 2026 स्पर्धेत दहाही संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहे. कोण जेतेपद मिळवणार? याची उत्सुकता आहे. पण ऋषभ पंत कर्णधार असलेला संघ आयपीएलच्या टॉप 6 मध्येही जागा मिळवणार नाही, असं भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे एलएसजीचे चाहते संतापले आहेत.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी सीएसकेच्या माजी खेळाडूने ऋषभ पंतच्या लखनौ संघाची लाज काढली, म्हणाला..
IPL 2026 स्पर्धेपूर्वी सीएसकेच्या माजी खेळाडूने ऋषभ पंतच्या लखनौ संघाची लाज काढली, म्हणाला..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 23, 2026 | 9:45 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत जेतेपद कोण मिळवणार हे आता सांगणं कठीण आहे. पण संघाची बांधणी आणि खेळाडूंचा फॉर्म पाहून अंदाज व्यक्त केला जात आहे. मागच्या पर्वात केलेला चुका सुधारत पुन्हा एकदा संघ मैदानात उतरणार आहेत. मागच्या पर्वात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. पण यावेळी नव्या ताकदीसह संघ तयारी करत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघ मागच्या वेळी सातव्या क्रमांकावर राहिला होता. लखनौ सुपर जायंट्सने 14 पैकी फक्त 6 सामने जिंकले होते. तसेच 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. 27 कोटी रुपये मोजून फ्रेंचायझीने ऋषभ पंतला संघात घेतलं. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण खेळाडू आणि कर्णधार म्हणून निष्फळ ठरला. सुमार कामगिरी करूनही लखनौ सुपर जायंट्सने या पर्वात त्याच्यावर विश्वास टाकला आहे. त्याच्या नेतृत्वात पुन्हा एकदा संघाची बांधणी केली आहे. त्यामुळे यंदा कशी कामगिरी करणार याकडे लक्ष आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आर अश्विनने सुमार शेरा दिला आहे.

आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, या स्पर्धेतील टॉप 3 संघ तर आधीच ठरले आहेत. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी तीव्र लढत असेल. पण लखनौ सुपर जायंट्सचा यात नसेल. लखनौ सुपर जायंट्स संघ टॉप 6 मध्ये जागा मिळवणार नाही. त्यामुळे यंदाच्या पर्वातही लखनौ सुपर जायंट्सच्या पदरात निराशा पडेल असं भाकीत त्याने वर्तवलं आहे. एकीकडे, फ्रेंचायझी जेतेपदाचं स्वप्न पाहात असताना दुसरीकडे, आर अश्विनने सुमार शेरा दिला आहे. त्यामुळे आता लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी कशी राहते याकडे लक्ष असणार आहे. मागच्या दोन पर्वात तर लखनौने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. तसेच 2022 पासून संघाने एकदाही अंतिम फेरी गाठलेली नाही.

लखनौ सुपर जायंट्स संघ : ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), एडन मार्करम, मिचेल मार्श, मोहम्मद शमी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एनरिक नॉर्खिया, वानिंदु हसरंगा, आयुष बडोनी, अब्दुल समद, आर्यन जुयाल, हिम्मत सिंह, मॅथ्यू ब्रीट्जके, शहबाज अहमद, नमन तिवारी, अर्शिन कुलकर्णी, अर्जुन तेंडुलकर, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, एम. सिद्धार्थ, प्रिंस यादव, आकाश सिंह आणइ जोश इंग्लिस

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?