क्रिकेटला रामराम, मग आमदार, आता थेट क्रीडा राज्यमंत्रीपदी वर्णी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं होतं.

क्रिकेटला रामराम, मग आमदार, आता थेट क्रीडा राज्यमंत्रीपदी वर्णी
Manoj Tiwari
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 7:52 PM

कोलकाता : देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करतोय. त्याच दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडली. राज्यात एकूण 294 जागांसाठी मतदान झाले. ही निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली. मात्र, येथील 294 जागांपैकी शिवपूर (Shibpur Election) या मतदारसंघाची विशेष चर्चा होती. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने (TMC) माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना मैदानात उतरवलं होतं. तर भाजपकडून येथे रतीन चक्रवर्ती (Rathin Chakraborty) यांना विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. या निवडणुकीत मनोज तिवारीन यांनी रतीन चक्रवर्तींचा 32 हजार मतांनी पराभव केला. (Mamatas list of ministers,17 new faces including cricketer Manoj Tiwari)

दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मनोज तिवारी यांना क्रीडा व युवक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रिकेटपटू मनोज तिवारी आपल्या पत्नीसमवेत टीएमसीमध्ये दाखल झाले होते. भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. जोरदार प्रचारानंतर त्यांनी निवडणूक जिंकत आमदारकी मिळवली, त्यानंतर आता त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळालं आहे.

मनोज तिवारी यांची क्रिकेट कारकीर्द

मनोज तिवारी भारतीय संघांसाठी 12 एकदिवसीय तर 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 287 धावा जमवल्या आहेत. त्यामध्येही एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 104 ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

आयपीएलमधील कामगिरी

मनोज तिवारी यांना 98 आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये त्यांनी 28.72 च्या सरासरीने 1695 धावा जमवल्या. आयपीएलमध्ये त्यांचा सर्वाधिक स्कोर 75 इतका आहे. आयपीएलमध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

रणजी करंडकात चमकदार कामगिरी

मनोज तिवारी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप लहान आहे. मात्र 2006-07 मध्ये रणजी करंडकातील त्यांचा पराक्रम कोणालाही विसरता येणार नाही. या करंडकात मनोज तिवारी यांनी 99.50 च्या सरासरीने 796 धावा चोपल्या होत्या. या कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघात स्थान मिळालं आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांची संघात निवड झाली. तथापि, सामन्याआधी ते दुखापतग्रस्त झाले होते आणि त्यानंतर त्यांना 2008 मध्ये भारतीय संघात संधी मिळाली.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही धुमाकूळ

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिवारी यांनी 125 सामन्यांच्या 196 डावांमध्ये 8965 धावा फटकावल्या आहेत. 303 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर लिस्ट ए मधील 163 सामन्यांमध्ये त्यांनी 5466 धावा जमवल्या आहेत. गोलंदाजीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 31 तर लिस्ट ए सामन्यांमध्ये 60 विकेट्सदेखील मिळवल्या आहेत.

संबंधित बातम्या

ममतादीदींचं जम्बो मंत्रिमंडळ, 7 मुस्लिम, 8 महिलांचा समावेश; ‘एम’ फॅक्टरला विशेष स्थान

हिमंत बिस्व सरमांना आसामचं मुख्यमंत्रिपद का?, पूर्वोत्तर राज्यांसाठीचा भाजपचा प्लान काय?; वाचा सविस्तर

(Mamatas list of ministers,17 new faces including cricketer Manoj Tiwari)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.