IPL Auction मध्ये ‘या’ खेळाडूच 2 कोटीच नुकसान, आता ठोकली डबल सेंच्युरी, 11 SIX

IPL मध्ये हा खेळाडू नेहमीच आपल्या तुफानी बॅटिंगसाठी चर्चेत असतो. आता त्याने पुन्हा एकदा करिष्माई खेळ दाखवलाय.

IPL Auction मध्ये 'या' खेळाडूच 2 कोटीच नुकसान, आता ठोकली डबल सेंच्युरी, 11 SIX
Manish pandeyImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 5:29 PM

नवी दिल्ली: IPL मध्ये काही भारतीय खेळाडू मागच्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रदर्शन करतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना आयपीएलसारखं यश मिळालं नाही. पण हे खेळाडू चर्चेत असतात. असाच एक खेळाडू आहे, मनीष पांडे. त्याने गोव्याच्या टीमविरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. मनीष पांडेने अवघ्या 186 चेंडूत 208 धावा फटकावल्या. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मनीष पांडेने वनडे स्टाइल बॅटिंग केली. त्याने 11 षटकार आणि 14 चौकार लगावले. मनीष पांडे शेवटपर्यंत नाबाद होता.

देशातंर्गत क्रिकेटमध्ये कमालीच प्रदर्शन

मनीष पांडे भले टीम इंडियाच्या बाहेर असेल. पण देशातंर्गत क्रिकेटमध्ये तो जबरदस्त प्रदर्शन करतोय. मनीष पांडेने गोव्या विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शानदार डबल सेंच्युरी झळकवली. पांडेच्या करिष्माई प्रदर्शनाच्या बळावर कर्नाटकने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 603 धावांचा डोंगर उभारला. मनीष पांडे शिवाय ओपनर आर.समर्थने शानदार सेंच्युरी झळकवली. त्याने 140 धावा केल्या.

कुठल्या बॉलरला धुतलं?

फर्स्ट क्लास मॅचमध्ये मनीष पांडेच ही 22 वी सेंच्युरी आहे. याच सीजनमध्ये त्याने पहिली सेंच्युरी झळकवली आहे. मनीष पांडेने गोव्याचा गोलंदाज फिलिक्स एलिमाओवर हल्लाबोल केला. त्याने आक्रमक बॅटिंग केली. एलिमाओ विरुद्ध मनीषने 29 चेंडूत 57 धावा ठोकून काढल्या.

मागच्या सीजनमध्ये किती कोटीला विकत घेतलेलं?

अलीकडेच आयपीएल 2023 साठी ऑक्शन झालं. यामध्ये मनीष पांडेला दिल्ली कॅपिटल्सने 2.4 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मागच्या सीजनमध्ये मनीषला लखनौ सुपरजायंट्सने 4.6 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. पण यावेळी 2.2 कोटी रुपयांच नुकसान झालं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.