AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement : पहिल्या टी-20 आधी टीम इंडियाला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची झटक्यात निवृत्ती

Cricket Retirement : आगामी आशिया कपच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट संतुलित संघ बनवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार आहेत. आधीच टीम इंडियासमोर अडचणी असताना एका स्टार खेळाडूने निवृत्ती आहे.

Retirement : पहिल्या टी-20 आधी टीम इंडियाला मोठा झटका, 'या' स्टार खेळाडूची झटक्यात निवृत्ती
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून भारतीय खेळाडूंची वनडे वर्ल्डकपसाठी पारख केली जात आहे. पण चौथ्या क्रमांकाचं कोडं अजून काही सुटलेलं नाही. 2019 पासून यासाठी परीक्षण घेतलं जात आहे. पण अजूनही यात कोणताही खेळाडू फीट बसलेला नाही. आतापर्यंत दहा खेळाडू या क्रमांकावर खेळले आहेत. पण यात फक्त श्रेयस अय्यरच चांगली कामगिरी करू शकला आहे.
| Updated on: Aug 03, 2023 | 4:27 PM
Share

मुंबई : टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आता टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. आधी कसोटी आणि वन डे सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आगामी आशिया कपच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट संतुलित संघ बनवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार आहेत. आधीच टीम इंडियासमोर अडचणी असताना एका स्टार खेळाडूने निवृत्ती आहे.

कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडियाचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मनोज तिवारी आहे. मनोज तिवारीने सुरूवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र टीम इंडियामध्ये तो जास्त वेळ आपलं स्थान टिकवू शकला नाही. जवळपास गेली 8 वर्ष मनोज तिवारी टीम इंडियाच्या संघात नाही. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी मनोज तिवारी ओळखला जातो. इतकंच नाहीतर मनोज तिवारी हा सध्या पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहे.

View this post on Instagram

A post shared by MANOJ TIWARY (@mannirocks14)

2015 साली टीम इंडियाकडून मनोज तिवारीने शेवटचा सामना खेळला होता. 2008 ला त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे सामन्यामध्ये डेब्यू केला होता. 12 वन डे सामने आणि 3 टी-20 सामन्यांमध्ये मनोज तिवारीने भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. यामधील वन डे सामन्यामध्ये 287 धावा केल्या होत्या यामध्ये 1 शतक मारलं होतं. तर टी-20 सामन्यामध्ये 15 च्या सरासरीने 5 धावा केल्या आहेत.

दरम्यान, मनोज तिवारी आयपीएलमध्येही खेळला असून त्याने कोलकाता नाईट रायडर्स, पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये 98 सामने खेळताना 28.72 च्या सरासरीने 1695 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 अर्धशतके केली आहेत.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.