AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : आयपीएलमध्येही ‘करेक्ट कार्यक्रम’, एका कॅचने पालटला गेम; फिरकीने झाला दिल्लीचा खेळ खल्लास

मयंक या सीझनमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळला आहे. त्याने 10 बळी घेतले आहेत. चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. या सीझनमध्ये त्याची इकॉनॉमी 6.42 एवढी आहे. फलंदाजांना धावा करू न देणे ही त्याच्या गोलंदाजीची खासियत आहे.

IPL 2023 : आयपीएलमध्येही 'करेक्ट कार्यक्रम', एका कॅचने पालटला गेम; फिरकीने झाला दिल्लीचा खेळ खल्लास
सनरायजर्स हैदराबाद टीमच्या मयंक मार्कंडे याने 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. मयंकने आपल्या लेग स्पिनच्या मदतीने दिग्गजांना प्रभावित केलं आहे. त्यामुळे आगामी काळात निवड समिती या 5 जणांपैकी कुणाला संधी देतं, याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2023 | 9:25 AM
Share

नवी दिल्ली : सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान कालचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. हैदराबादने दिल्लीला त्यांच्या होमपीचवरच आस्मान दाखवलं. कोणत्याही टीमला त्यांच्या होमपीचवर हरवणं तितकं सोपं नसतं. पण सनराइजर्स हैदराबादने ते करून दाखवलं आहे. म्हणूनच कालचा आयपीएलमधील हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कालच्या सामन्यात हैदराबादची केवळ गोलंदाजीच चालली नाही तर फलंदाजीही चालली. दिल्ली हा सामना जिंकेल असं काही वेळेला वाटून गेलं. पण हैदराबादच्या मयंक मार्कंडेयने अप्रतिम गोलंदाजी करत एका शानदार कॅचने संपूर्ण सामनाच पलटवला. मार्कंडेयच्या एका कॅचने दिल्लीचा करेक्ट कार्यक्रम करत जोरदार विजय मिळवला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान हा सामना खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने पहिली फलंदाजी केली. 20 षटकात सहा विकेट देत हैदराबादने 197 धावांची खेळी केली. त्याला उत्तर देताना दिल्लीची शेवटी शेवटी दमछाक उडाली. दिल्लीने 20 षटकं खेळत सहा विकेट दिले. पण दिल्लीला 188 धावांच्या पुढे जाता आलं नाही. अवघ्या नऊ धावांनी दिल्लीला पराभूत व्हावं लागलं.

फिरकीने खेळ खल्लास

मयंकने या सीझनमध्ये हैदराबादसाठी चांगली कामगिरी केली आहे. मयंक सातत्याने विकेट घेत आहे. कालच्या सामन्यातही त्याने अप्रतिम आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने त्याच्या कोट्यातील चार षटकांमध्ये फक्त 20 धावा दिल्या. सोबत दोन बळीही टिपले. यात त्याने सॉल्टला आऊट केलं. विशेष म्हणजे सॉल्ट काल जोरदार फॉर्मात होता. त्याने धडाकेबाज सुरुवात केली होती.

सॉल्ट असेपर्यंत दिल्ली जिंकणार असंच वाटत होतं. मात्र, मयंकने आपल्या अफलातून फिरकीने सॉल्टचा बळी घेत दिल्लीच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. मयंकाने अफलातून गोलंदाजी करतानाच अप्रतिम क्षेत्ररक्षणही केलं. त्याने सॉल्टची विकेट काढली, हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. सॉल्टची विकेट गेल्यानंतर दिल्लीही बॅकफूटवर गेली.

वादळ थांबलं

मयंक 12 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी मयंकने ऑफ स्टम्प बाहेर चेंडू टाकला. सॉल्टने पाय पुढे टाकत हा चेंडू टोलवला. सॉल्टने थेट शॉट मारला होता. मयंकपासून थोड्या अंतरावर हा चेंडू होता. मयंकनेही डाइव्ह मारून अप्रतिम झेल घेत सॉल्टला तंबूत पाठवलं. त्यामुळे मैदानात घोंघावणारं सॉल्ट नावाचं वादळ थांबलं. फिल सॉल्टने 35 चेंडूत 59 धावा कुटल्या. त्यात नऊ चौकारांचा समावेश आहे. त्याने मिशेल मार्श सोबत 112 धावांची भागिदारी केली. याच सामन्यात मयंकने दिल्ली कॅपिटल्समधून पदार्पण करणाऱ्या प्रियम गर्गचाही बळी घेतला.

सर्वांचं लक्ष वेधलं

मयंक गेल्या सीझनपर्यंत मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता. मात्र, मुंबई इंडियन्सकडून त्याला फारशी संधी मिळाली नाही. मागच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून तो अवघे दोन सामने खेळला. या सीझनमध्ये टीमने त्याला रिलीज केलं. त्यानंतर हैदराबादने त्याची निवड केली. हैदराबादकडूनही सुरुवातीच्या सामन्यात त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर पंजाब किंग्सच्या विरोधात खेळण्याची त्याला संधी मिळाली. यावेळी त्याने चार विकेट घेऊन सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं.

Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू