AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs GT IPL 2023 : मुंबईकडे आज गुजरातच स्वप्न धुळीस मिळवण्याची संधी, रोहित शर्माची पोरं आता जास्त खतरनाक

MI vs GT IPL 2023 : आज घरात नंबर 1 टीमला धुणार. गुजरात आणि मुंबईमध्ये या सीजनमधील दुसरा सामना होणार आहे. सीजनमधील पहिल्या सामन्यात गुजरातची टीम 55 रन्सनी जिंकली होती.

MI vs GT IPL 2023 : मुंबईकडे आज गुजरातच स्वप्न धुळीस मिळवण्याची संधी, रोहित शर्माची पोरं आता जास्त खतरनाक
MI vs GT IPL 2023
| Updated on: May 12, 2023 | 12:59 PM
Share

मुंबई : IPL 2023 चा प्रवास आता शेवटच्या टप्प्याकडे सुरु आहे. आता सर्वच टीम्समध्ये खरी लढाई सुरु झालीय. कुठल्याही टीमला आता पराभव परवडणारा नाहीय. चुकांमधून शिकण्याची वेळ आता निघून गेलीय. प्रयोग करण्याचा वेळ सुद्धा निघून गेलीय. आता होणारे सामने करो या मरो मुकाबले आहेत. शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आयपीएलमध्ये 57 वा सामना खेळला जाणार आहे.

गुजरात टायटन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. आजचा सामना जिंकल्यास त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल. मुंबई इंडियन्सकडे त्यांचा प्लेऑफ प्रवेशाचा मार्ग रोखण्याची संधी आहे. त्याचवेळी आज जिंकल्यास पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईच स्थान अधिक भक्कम होईल.

पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम कुठल्या स्थानावर?

रोहित शर्माची टीम 12 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. अजून एक पराभव मार्ग कठीण बनवू शकतो. गुजरात आणि मुंबईमध्ये या सीजनमधील दुसरा सामना होणार आहे. सीजनमधील पहिल्या सामन्यात गुजरातची टीम 55 रन्सनी जिंकली होती.

आता मुंबई जास्त धोकादायक

पहिल्या मॅचच्या तुलनेत मुंबईची टीम आता जास्त मजबूत दिसतेय. मुंबई इंडियन्सची टीम सीजनमध्ये आता जास्त खतरनाक बनलीय. मागच्या सामन्यात मुंबईने RCB ला हरवून पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली होती. मुंबईने, बँगलोरने विजयासाठी दिलेलं 200 रन्सच टार्गेट 17 व्या ओव्हरमध्येच गाठलं होतं.

मुंबईची डोकेदुखी काय?

मुंबईची टीम फॉर्ममध्ये परतलीय. पण मुंबईला आपल्या नेट रनरेटवर लक्ष द्यावं लागेल. मुंबईने आपल्या बॅटिंग लाइनअपमध्ये सुद्धा बदल केले. सध्या रोहित शर्माचा फॉर्म मुंबई इंडियन्सची डोकेदुखी बनलाय. मागच्या 4 पैकी 2 सामन्यात तो डकवर आऊट झालाय. त्याने उर्वरित दोन सामन्यात मिळून 10 धावा केल्यात.

गोलंदाजीची चिंता

मुंबई इंडियन्सला गोलंदाजीवर लक्ष देण्याची गरज आहे. कारण सलग 4 सामन्यात प्रतिस्पर्धी टीमने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. गुजरातचा सुद्धा मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल.

घराबाहेर गुजरातची टीम धोकादायक

गुजरातची टीम सलग दुसऱ्यांदा किताबासाठी दावेदार आहे. या सीजनमध्ये घराबाहेर खेळताना हार्दिक पंड्याने एकही सामना गमावलेला नाही. गुजरातची टीम ज्या 3 मॅचमध्ये हरली, ते तिन्ही सामने गुजरातमध्ये होते. Dream 11 Prediction

कॅप्टन : शुभमन गिल

उपकर्णधार : सूर्यकुमार यादव

विकेटकीपर : इशान किशन, ऋद्धिमान साहा

फलंदाज : सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शुभमन गिल, डेविड मिलर

ऑलराउंडर्स : कॅमरन ग्रीन, हार्दिक पंड्या

गोलंदाज : पीयूष चावला, राशिद खान, मोहम्मद शमी

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.