AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RR : राजस्थानची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, मुंबईचा 30 धावांनी धुव्वा, पलटणचा पराभवाने शेवट

Mumbai Indians vs Rajasthan Royals Match Result, IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर वानखेडे स्टेडियममध्ये 206 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र जबरदस्त बॉलिंग करुन राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मुंबईला 175 धावांवर रोखत प्लेऑफमध्ये धडक दिली आहे.

MI vs RR : राजस्थानची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, मुंबईचा 30 धावांनी धुव्वा, पलटणचा पराभवाने शेवट
Rajasthan Royals Qualified For PlayoffsImage Credit source: Bcci
| Updated on: May 24, 2026 | 8:44 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 रन्सपर्यंतच पोहचता आलं. राजस्थान रॉयल्सने यासह साखळी फेरीतील आपला शेवटचा आणि 14 वा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली आहे. राजस्थानच्या विजयामुळे प्लेऑफचे चारही संघ अखेर निश्चित झाले आहेत. तसेच राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहचण्याची ही सातवी वेळ ठरली आहे. तर मुंबई आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईचा हा या हंगामातील राजस्थान विरुद्धचा दुसरा आणि एकूण दहावा पराभव ठरला आहे.

पहिल्या डावात काय झालं?

मुंबईने टॉस जिंकल्यानंतर राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानने सांघिक खेळीच्या जोरावर वानखेडे स्टेडियममध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वाल याने 27, ध्रुव जुरेल याने सर्वाधिक 38 आणि जोफ्रा आर्चरने 32 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही आपली भूमिका बजावली. मुंबईसाठी दीपक चाहर आणि शार्दूल ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

मुंबईची बॅटिंग

मुंबईचे टॉप ऑर्डरमधील तिन्ही फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्मा याला भोपळाही फोडता आला नाही. नमन धीर 6 तर रायन रिकेल्टन याने 12 धावा केल्या. तिलक वर्मा याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र तिलकने निराशा केली. तिलकने 3 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 60 धावा केल्या. विल जॅक्स याने 33 आणि कॅप्टन हार्दिक पंड्या याने 34 धावांचं योगदान दिलं. मात्र यापैकी एकालाही चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मुंबईला विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. तर इतरांनाही काही खास करता आलं नाही. राजस्थानने अशाप्रकारे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 175 रन्सवर रोखलं आणि प्लेऑफमधील चौथं स्थान निश्चित केलं.

जोफ्रा आर्चर ‘मॅन ऑफ द मॅच’

राजस्थानासाठी जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यश राज पुंजा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. ऑलराउंड कामगिरी करणारा जोफ्रा आर्चर ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

मुंबई-राजस्थान स्कोअरकार्ड

मुंबई अपयशी

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत 16 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई सामना जिंकून या हंगामात 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची 17 वी वेळ ठरेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र पलटण आपल्या चाहत्यांच्या विश्वास सार्थ ठरवण्यात अपयशी ठरली.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल