MI vs SRH : हेड-क्लासेनचा झंझावात, हैदराबादचा विजयी पंच, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Result, IPL 2026 : रायन रिकेल्टन याच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

Nitish Kumar Reddy and Heinrich Klaasen
Image Credit source: Bcci
ट्रॅव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. मुंबईने रायन रिकेल्टन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने हे आव्हान 8 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केंल. हैदराबादने 18.4 ओव्हरमध्ये 249 धावा केल्या. हैदराबादने अशाप्रकारे आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सलग पाचवा आणि एकूण सहावा विजय ठरला आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा एकूण सहावा तर वानखेडे स्टेडियममधील चौथा पराभव ठरला.
Follow Us