सर्वसामान्य मुलांनी टीम इंडियासाठी खेळायचं स्वप्न पाहावं की नाही? कधीपासून आणि कशी तयारी करावी? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवणं आता खायचं काम राहिलं नाही. देशभरातील खेळाडूंमधून अवघ्या 16 खेळाडूंना संधी मिळते. बीसीसीआय खेळाडूंना कोटीमध्ये वेतन देतं. तसा खर्चेही खेळाडूंना आधी करावा लागतो. पण जर सर्वसामान्य मुलाने हे स्वप्न पाहावं की नाही यासाठी त्याला कशा प्रकारची तयारी करावी लागेल जाणून घ्या.

सर्वसामान्य मुलांनी टीम इंडियासाठी खेळायचं स्वप्न पाहावं की नाही? कधीपासून आणि कशी तयारी करावी? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 11:41 PM

भारतात क्रिकेटकडे फक्त खेळ म्हणून पाहिलं जात नाही. जशा माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. यामध्ये क्रिकेटचा समावेश केला तर वावगं ठरणार नाही. कारण क्रिकेट खेळासह खेळाडूंवर प्रेम करणारा चाहतावर्ग आहे. भारतीय क्रिकेटचे सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, कपिल देव, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि विराट कोहली हे हिरो आहेत. असे अनेक खेळाडू आहेत पण यांच्याशिवाय क्रिकेटचा इतिहास पूर्ण होणार नाही. सुरूवातीपेक्षा आता क्रिकेटची वेड पहिल्यापेक्षा जास्त आहे. आता प्रत्येकजण कुठूनही आपल्या मोबाईलवर क्रिकेट सामना पाहू शकतो. क्रिकेटप्रेमीच नाहीतर आता भारतीय संघात स्थान मिळवण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र यामध्ये काहींना यश येतं किंवा अपयश, आता स्पर्धाही तितकीच वाढली आहे. पण तुम्हाला भारतीय संघात पोहोचण्यासाठीचे काही टप्पे आहेत. ते जर तुम्ही पार केले तर तुम्ही पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवायला वेळ लागणार नाही.

भारतीय संघामध्ये तुम्हाला जागी पक्की करायची असेल तर कमी वयात क्रिकेट खेळायला सुरूवात करावी. यामध्ये पण असं होतं की काहींच्या पालकांची इच्छा असते आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावं. मात्र, त्या मुलाचे स्वप्न काही वेगळीच असतात. सुरूवातीला पालकांनी क्रिकेट क्लबमध्ये घातलं आहे म्हणून ते खेळतात. याचा काही उपयोग होत नाही, तो फार काही मोठा खेळाडू होत नाही. दुसरा तोटा म्हणजे पैसा आणि वेळ दोन्हीपण वाया. क्रिकेटमध्ये खेळाडूंना करोडोंचं मानधन आणि प्रसिद्धी मिळते. अनेकजण या गोष्टींना भाळतात. त्यामुळे पालक आणि मुलांनीही वेळीच या सर्व गोष्टी पाहायला हव्यात.

भारतीय क्रिकेट संघात जाण्यासाठी काही टप्पे

कमी वयात क्रिकेट क्लब जॉईन केला तर तुम्ही त्या वातावरणात राहता. वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकता येतात. तुम्ही मोठ्या शहरात असाल तर क्लब तुम्हाला उपलब्ध असतील. प्रशिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यामुळे त्याचा मोठा फायदा होतो. ग्रामीण भागात असाल तर तालुका किंवा जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली आपला सराव सुरू ठेवा. कारण क्रिकेटचा खरा पाया हा शालेय क्रिकेटमध्येच रचला जातो. तुम्ही शालेय सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यावर तुमची जिल्ह्यावर निवड होते. जिल्हास्तरावर आंतरजिल्हा स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याने तुम्हाला विभागीय स्तरावर, आंतरविभागीय स्पर्धांमध्ये आपली छाप उमटावी लागणार त्यानंतर राज्याच्या संघात निवडलं जातं. आपण पटकन बोललो निवड होते पण यासाठी तुम्हाला तितकाच संघर्ष आणि आव्हानं पार करावी लागणार आहेत.

राज्यासाठी खेळु लागले की रणजीमध्ये तुम्हाला स्थान मिळतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुम्ही चर्चेत राहायला हवे. कारण देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धा असतील त्यामध्ये तम्हाला फक्त चमकदारच नाहीतर अफलातून कामगिरी करावी लागणार. असं नाही की एखाद्या साामन्यात चांगलं प्रदर्शन केलं म्हणजे झालं. फक्त एका सामन्यात नाहीतर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्हाला स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागेल. क्रिकेटमध्ये वयोगटातील अनेक स्पर्धा होतात, या स्पर्धांमध्ये सर्वांचं तुमच्या कामगिरीकडे लक्ष असतं. अंडर 14, 16, 19, 23 आणि त्यानंतर असे वयोगट असतात.

शिक्षण आणि क्रिकेट दोन्हीमध्ये ठेवावा लागतो ताळमेळ

क्रिकेटमध्ये करियर करण्याचं ठरवलं असलं तरी प्रत्येक खेळाडूला शिक्षणाकडेही लक्ष द्यावं लागतं. कारण क्रिकेटमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार याची काळजी घ्यावी लागते. क्रिकेटमध्ये प्रगती करत असताना शाळा-महाविद्यालयातील शिक्षण घेणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधाणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस. फिटनेस चांगला जर असेल तर तुम्ही सर्व गोष्टी नियोजनाप्रमाणे होतात. तुम्ही मेहनत  घेत असताना प्रामाणिकपणे करा, कारण आता आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीचे स्काऊट्स आहेत. जगभर फिरतीवर असतात, जगभरात होणाऱ्या लीग्स आणि भारतातील देशांतर्गत होणाऱ्या  क्रिकेट स्पर्धांवर नजर ठेवतात.

वयोगटातील सामन्यांमध्ये तुम्ही चांगला खेळ करून निवड समितीचं लक्ष वेधलं तर तुमच्यासाठी मोठी गोष्ट असणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्याकडे रणजी, सय्यद मुश्चाक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी, इराणी चषक होतात. या स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट संघामध्ये जाण्याची चावी असते. आता तर दुसरी गोष्ट म्हणजे आयपीएलमुळे खेळाडूंना संधी वाढली आहे. कारण आयपीएलमध्ये तुम्ही अफलातून कामगिरी केली. तर थेट भारतीय संघामध्येही तुम्हाला एन्ट्री मिळते. याचं सर्वात मोठी उदाहरणे म्हणजे जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या ही आहेत. बडोद्याकडून खेळणाऱ्या पंड्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतलं होतं. त्यानंतर दोन आयपीएल सीझनमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर त्यालाही भारतीय संघाचं तिकीट मिळालं.

वर्ल्ड नंबर वन असलेला बॉलर जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये केलेली घातक गोलंदाजी. बीसीसीआय अशा खेळाडूंना लवकर संधी देतं. या संधीचं सोनं करता आलं तर ठिक नाहीतर तुम्हाला संघाबाहेरही काढलं जातं. आयपीएलमधील कामगिरीवर वरूण चक्रवर्ती याला थेट 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र प्रभावशाली कामगिरी करता आली नाही, त्यानंतर त्याला डच्चू देण्यात आला. अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्यात चांगली कामगिरी करतात. निवड समितीसुद्धा त्यांना संधी देऊन पाहते मात्र खराब प्रदर्शनामुळे त्यांची जागा जाते. त्यामुळे संघात स्थान मिळवल्यावर तुम्हाला कामगिरीमध्ये सातत्य ठेवता आलं पाहिजे.

रणजी खेळणाऱ्यांनाही भरघोस मानधन

रणजीमधील खेळाडू किती सामने खेळला आहे. त्यानुसार बीसीसीआय 40,000 ते 60,000 रुपये प्रतिदिन मॅच फी म्हणून देते. 21 ते 40 सामने खेळलेला खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल तर 50,000 प्रतिदिन, राखीव खेळाडूंना 25,000 प्रतिदिन. 0-20 सामने खेळलेला खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल तर 40,000 प्रतिदिन, राखीवांसाठी INR 20,000 प्रतिदिन. तर न खेळणाऱ्या खेळाडूला 25,000 प्रतिदिन मिळतात.

भारतीय संघातील खेळाडूंचं मानधन

बीसीसीआय भारतीय खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशा 4 श्रेणींनुसार वर्गवारी करते. त्या वर्गवारीनुसार खेळाडूंना वार्षिक वेतन ठरतं. त्यानुसार बीसीसीआयच्या ए प्लस या कॅटेगरीमध्ये आधी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या तिघांचा समावेश होता. यामध्ये आता रवींद्र जडेजा याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रोहित, विराट, बुमराह याच्यासह जडेजालाही वार्षिक 7 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंचाही पहिल्यांदा वार्षिक करारात समावेश केला आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशा 4 श्रेणींनुसार वर्गवारी करते. त्या वर्गवारीनुसार खेळाडूंना वार्षिक वेतन ठरतं. रोहित, विराट, बुमराह याच्यासह जडेजालाही वार्षिक 7 कोटी रुपये तर ‘ए’ श्रेणीमधील खेळाडूंना 5 कोटी, ‘बी’ श्रेणीमधील खेळाडूंना 3 कोटी आणि ‘सी’ श्रेणीमधील खेळाडूंना 1 कोटी मानधतं मिळतं. या खेळाडूंचा तिन्ही फॉरमॅटमध्ये समावेश असतो.

कोणत्या ग्रेडमध्ये कोणते खेळाडू?

ए प्लस | रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा. ए | रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या. बी | सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल. सी | रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.