AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 : हरमनप्रीत विरुद्ध स्मृती यांच्यात कडवी झुंज, मुंबईकडे बंगळुरुविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत नंबर 1 होण्याची संधी

WPL 2025 MI vs RCB : मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये 5 विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे.त्यामुळे पलटणकडे आरसीबीविरुद्ध विजय मिळवून पहिल्या स्थानी पोहचण्याची संधी आहे.

WPL 2025 : हरमनप्रीत विरुद्ध स्मृती यांच्यात कडवी झुंज, मुंबईकडे बंगळुरुविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत नंबर 1 होण्याची संधी
MI VS RCB WPL 2025Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Mar 11, 2025 | 5:40 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना एका बाजूला आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसरा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. डब्ल्यूपीएल स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील (WPL 2025) साखळी फेरीतील 20 व्या आणि शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चँलेंजर्स आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील आठवा आणि अंतिम सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडून हा सामना जिंकून साखळी फेरीतील शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न आहे. टीम इंडियाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर गतविजेता बंगळुरुचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना औपचारिकता आहे.

बंगळुरुकडे हा सामना जिंकून पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. मुंबई-बंगळुरु या हंगामात याआधी 21 फेब्रुवारीला आमनेसामने आले होते. तेव्हा मुंबईने बंगळुरुवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता बंगळुरुकडे या पराभवाची अचूक परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे आता मुंबई या हंगामात सलग दुसर्‍यांदा आरबीसीवर विजय मिळवते की स्मृती मंधानाची टीम हरमनप्रीत कौरच्या संघाला पराभवाची धुळ चारते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईला नंबर 1 होण्याची संधी

दरम्यान मुंबईला या सामन्यात विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 होण्याची संधी आहे. मुंबई सध्या दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबई 10 गुणांसह +0.298 अशा नेट रनरेटसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्ली 10 गुण आणि +0.396 नेट रनरेटसह पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकल्यास ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचतील.

मुंबई इंडियन्स वूमन्स टीम : हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, जिंतीमणी कलिता, अमनदीप कौर आणि अक्षिता माहेश्वरी.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वूमन्स टीम : स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, शार्लोट डीन, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिश्त, डॅनिएल व्याट-हॉज, नुजहत परवीन, हेदर ग्रॅहम, जाग्रवी पवार, प्रेमा रावत आणि जोशीथा व्ही.जे.

Follow Us
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?