AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद शमीची अखेर टीममध्ये एन्ट्री, या सामन्यातून मैदानात करणार पुनरागमन!

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी क्रिकेट मैदानात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्या त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि आता मैदानात परतणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी तो मैदानात आपल्या गोलंदाजीची झलक दाखवणार आहे.

मोहम्मद शमीची अखेर टीममध्ये एन्ट्री, या सामन्यातून मैदानात करणार पुनरागमन!
| Updated on: Aug 29, 2024 | 4:56 PM
Share

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. मोहम्मद शमी शेवटचा वनडे वर्ल्डकप 2023 खेळला होता. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. नोव्हेंबर 2023 पासून मोहम्मद शमी मैदानात उतरलेला नाही. आता जवळपास 9 महिन्यांच्या कालावधीनंतर शमीने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. असं असताना त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशांतर्गत हंगामासाठी बंगालच्या 31 सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच मोहम्मद शमी रणजी स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. बंगाल संघातून मोहम्मद शमी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. शमी 11 ऑक्टोबरला युपी विरुद्ध रणजी स्पर्धेत उतरू शकतो. त्यानंतर बंगलाचा दुसरा सामना 18 ऑक्टोबरला बिहार विरुद्ध आहे. हा सामना कोलकात्यात होणार आहे. शमी या दोन पैकी एका सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याची धडपड असेल. तर टीम इंडिया 19 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली नाही तर या मालिकेतून मोहम्मद शमीचं पुनरागमन होऊ शकतं. जर दोन्ही मालिकेत तसं झालं नाही तर मग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नजर असेल. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे

बंगालने 31 खेळाडूंच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफचंही नाव सहभागी केलं आहे. त्याचबरोबर वृद्धिमान साहा देखील या यादीत सहभागी आहे. वृद्धिमान साहा थोड्या काळासाठी त्रिपुराला गेल्यानंतर बंगालबरोबर पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज आहे.

रणजी ट्रॉफी 2024-25 साठी बंगालचा संभाव्य संघ

अभिमन्यू ईश्वरन, अनुस्तुप मजुमदार, ऋद्धिमान साहा, सुदीप कुमार घरामी, सुदीप चॅटर्जी, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रिटिक चॅटर्जी, सौरव पॉल, शुवम डे, अंकुर पॉल, अवलिन घोष, प्रदिपता यामानिक, विभव कुमार, विभान कुमार, ए. गनी, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, आकाश दीप, सूरज सिंधू जयस्वाल, मोहम्मद कैफ, रवी कुमार, रोहित कुमार, सय्यद इरफान आफताब, युधाजित गुहा, अनंता साहा, गीत पुरी, प्रीतम चक्रवर्ती, सौम्यदीप मंडल, ऋषव विवेक, सुमित मोहंता.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.