AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद सिराजसाठी पाकिस्तानमध्ये राडा, Live कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू भिडले; पाहा व्हिडीओ

भारत इंग्लंड कसोटी मालिका संपून दोन दिवस उलटले आहेत. पण अजूनही या मालिकेची चर्चा रंगली आहे. पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या कामगिरीवरून पाकिस्तानात राडा झाला. काय ते जाणून घ्या..

मोहम्मद सिराजसाठी पाकिस्तानमध्ये राडा, Live कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू भिडले; पाहा व्हिडीओ
मोहम्मद सिराजसाठी पाकिस्तानमध्ये राडा, Live सामन्यात माजी क्रिकेटपटू भिडले; पाहा व्हिडीओImage Credit source: PTI
| Updated on: Aug 06, 2025 | 3:28 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने चमकदार कामगिरी केली. त्याने या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला. त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण पाकिस्तानमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमात त्याच्यावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोन माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी त्याच्यावरून वादाला पेटले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमद पाकिस्तानसाठी 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण त्याच्या दृष्टीने मोहम्मद सिराज हा कसोटीचा गोलंदाज नाही. यावरूनच लाईव्ह सामन्यात माजी क्रिकेटपटू आसिफ खानसोबत त्याचा वाद झाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय झालं ते जाणून घ्या

पाकिस्तानच्या पीटीव्ही स्पोर्ट्सवर ओव्हल कसोटी सामन्याचं विश्लेषण सुरु होतं. या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने सांगितलं की, ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज एकाच ठिकाणी गोलंदाजी करत होते. सिराजने चांगली गोलंदाजी केली. या कार्यक्रमाचं अँकरिंग डोमेस्टिक क्रिकेट खेळणारा आसिफ खान करत होता. त्याने तन्वीरला विचारलं की, तू तर सिराजला कसोटी बॉलर मानत नाही. त्यावर तन्वीरने सांगितलं की, सिराज त्या लेव्हलचा गोलंदाज नाही. यावर आसिफने विचारलं की, तुझी काय लेव्हल आहे?

असं विचारताच तन्वीर अहमद भडकला आणि सांगितलं की माझं स्टँडर्ड पाकिस्तान आहे. मी पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळलो आहे. यानंतर माजी क्रिकेटपूट तन्वीर आसिफला विचारलं की, तुझी काय लेव्हल आहे? तेव्हा आसिफने सांगितलं की ते सोडून दे. मला 20-22 वर्षे पत्रकारिता करून झाले. यावर तन्वीरने सांगितलं की, माझं क्रिकेटसोबत इतक्याच वर्षाचं नात आहे. यानंतर खूपच वादावादी झाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तन्वीर अहमदने यापूर्वी देखील भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वीर अहमदने असंच वादग्रस्त विधान केलं होतं. त्याने युट्यूब चॅनेलवर सांगितलं होतं की, भारताने ही ट्रॉफी कचऱ्याच्या पेटीत फेकली पाहीजे. कारण त्याचा काही फायदा नाही. त्याने आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्यावर खेळपट्टी भारताच्या बाजूने केल्याचा आरोप केला होता. इतकंच काय आयपीएल 2025 स्पर्धा फिक्स असल्याचा आरोप केला होता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.