T20 WC 2026 : भारतीय संघावर आमच्यापेक्षा जास्त दबाव, दक्षिण अफ्रिकेचा कोच कॉनराडने सांगून टाकलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारतासमोर दक्षिण अफ्रिकेचं आव्हान आहे. भारताने हे आव्हान मोडून काढलं तर उपांत्य फेरीचा मार्ग सोपा होईल. पण या सामन्यापूर्वीच दक्षिण अफ्रिकेचे प्रशिक्षक कॉनराड याने भारतीय संघाला इशारा दिला आहे.

T20 WC 2026 : भारतीय संघावर आमच्यापेक्षा जास्त दबाव, दक्षिण अफ्रिकेचा कोच कॉनराडने सांगून टाकलं
भारतीय संघावर आमच्यापेक्षा जास्त दबाव, दक्षिण अफ्रिकेचा कोच कॉनराडने सांगून टाकलं
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 21, 2026 | 7:59 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीत भारताचा पहिलाच सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. दक्षिण अफ्रिकेचं आव्हान भारतीय संघासाठी वाटते तितकं सोपं नाही. कारण दक्षिण अफ्रिकेनेही एकही सामना या स्पर्धेच्या साखळी फेरीत गमावलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघात अतितटीची लढत होऊ शकते. असं असताना दक्षिण अफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी आपलं मत मांडलं आहे. सराव सत्रादरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, ‘दोन्ही संघांवर दबाव आहे. पण चॅम्पियन असलेल्या भारतीय संघावर दडपण अधिक असणार आहे. दक्षिण अफ्रिका या दडपणाचा पुरेपूर फायदा घेईल. ‘ यासह कॉनराड यांनी पुढे सांगितलं की, ‘भारतीय संघावर उपांत्य आणि अंतिम फेरी गाठण्याचा दबाव असणार आहे. आशा आहे की आम्ही त्यांना उघडं पाडू. दबावाखाली आम्ही त्यांचा पुरेपूर फायदा घेऊ. पम भारतीय संघ कमकुवत नाही याची जाण आहे.’

“मला वाटतं आपण सर्वजण एखाद्या अव्वल संघाविरुद्ध खेळण्याच्या दबावाबद्दल बोलत असतो. पण त्यांच्यावर नेमके कोणते दबाव आहे हे आपल्याला माहिती नाही. गेल्या तीन सामन्यांत तीन वेळा शून्यावर बाद झालेल्या खेळाडूवर संघात स्थान मिळवण्याचे दबाव नाही, असे मी म्हणत नाही.” असं कॉनराडने सांगत अप्रत्यक्षरित्या अभिषेकच्या फॉर्मवरच बोट दाखवलं. आता टीम इंडिया या सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष असणार आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे खेळाडू वगळता इतर खेळाडूंची हवी तशी छाप पडलेली नाही.

टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीचं गणित सहज सोडावायचं असेल तर भारताला सुपर 8 फेरीतील तिन्ही सामने जिंकणं भाग आहे. अन्यथा गणित जर तर वर येऊ शकतं. त्यामुळे पहिल्याच सामन्यात विजय मिळवून या गटात आघाडी घेण्याच मानस दोन्ही संघांचा असणार आहे. विशेष म्हणजे भारत असलेल्या गटात सर्वच संघ अपराजित आहेत. म्हणजेच साखळी फेरीत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे सर्व संघांचा आत्मविश्वास दांडगा आहे. अशा स्थितीत सहज विजय मिळवणं कठीण आहे, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.