AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Most Runs in IPL: वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅप विजेता, साई-शुबमनची संधी किती धावांनी हुकली?

IPL 2026 Match Most Runs: वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ऑरेंज कॅप पटकावली आहे. अंतिम सामन्यातील काही षटकांनंतर ऑरेंज कॅपचं चित्र स्पष्ट झालं. जाणून घ्या शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांची संधी किती धावांनी हुकली.

Most Runs in IPL: वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅप विजेता, साई-शुबमनची संधी किती धावांनी हुकली?
RR Vaibhav Sooryavanshi IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: Jun 01, 2026 | 10:07 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची यशस्वीरित्या सांगता झाली. साखळी फेरीतील 70 आणि प्लेऑफमधील 4 अशा एकूण 74 सामन्यांनंतर 19 व्या मोसमातील विजेता निश्चित झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 31 मे रोजी गुजरात टायटन्सवर एकतर्फी फरकाने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. गुजरातने आरसीबीला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान विराट कोहली याने केलेल्या नॉट आऊट 75 रन्सच्या जोरावर एकतर्फी फरकाने पूर्ण करत विजय मिळवला. आरसीबीने 5 विकेट्सने महाअंतिम सामना जिंकला. या सामन्यासह ऑरेंज कॅप विजेताही निश्चित झाला.

वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅपचा मानकरी

ऑरेंज कॅपसाठी अंतिम सामन्यापर्यंत चढाओढ होती. वैभव सूर्यवंशी, साई सुदर्शन आणि शुबमन गिल या तिघांमध्ये रस्सीखेच होती. मात्र गुजरातचे सलामी फलंदाज साई आणि शुबमन स्वस्तात आऊट झाले. यासह वैभव ऑरेंज कॅप विजेता म्हणून निश्चित झाला.

शुबमन गिल आणि साई सुदर्शन अपयशी

शुबमन आणि साई या दोघांनी अंतिम सामन्याआधी अपवाद वगळता जबरदस्त कामगिरी केली. साईने अंतिम सामन्याआधी 710 धावा केल्या होत्या. तर शुबमनने 722 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र दोघे अंतिम सामन्यात अपयशी ठरले. शुबमनने 10 धावा केल्या. तर साईने शुबमनपेक्षा 2 जास्त धावा केल्या. त्यामुळे शुबमन 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसरा आणि साई तिसरा फलंदाज ठरला. शुबमनने 16 सामन्यांत एकूण 732 धावा केल्या. तर साई 17 सामन्यांत 722 धावा करण्यात यशस्वी ठरला.

वैभव सूर्यवंशीच्या 19 व्या मोसमात एकूण किती धावा?

शुबमनच्या वैभवच्या तुलनेत ऑरेंज कॅपपासून अवघ्या 44 धावांनी दूर राहिला. त्यामुळे वैभवला ऑरेंज कॅप पटकावण्यात यश आलं. वैभवने 16 सामन्यांत सर्वाधिक 776 धावा केल्या. वैभवने या दरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली. वैभवने 48.50 च्या सरासरीने आणि 237.31 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वैभवने या मोसमात चौकारांपेक्षा जास्त षटकार लगावले. वैभवने या मोसमात सर्वाधिक 72 षटकार लगावले. तर 63 चौकारही खेचले.

वैभव सूर्यवंशीने पटकावली ऑरेंज कॅप

गुजरात उपविजेता तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानी

दरम्यान गुजरातला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तर राजस्थान रॉयल्सचं क्वालिफायर 2 मध्ये आव्हान संपुष्ठात आलं. त्यामुळे राजस्थान तिसऱ्या स्थानी राहिली. राजस्थानला क्वालिफायर 2 पर्यंत पोहचवण्यात वैभव सूर्यवंशी याने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...