आयपीएल सारखं प्रत्येक डॉट बॉलवर झाड लावणार, महानार्यमन सिंधिया यांची घोषणा; गेमिंग अॅपही लॉन्च
मध्यप्रदेश क्रिकेट लीग (एमपीएल) 2025 चे आयोजन 12 जूनपासून होणार आहे. या वर्षी 7 पुरुष आणि 3 महिला संघ सहभागी होतील. सर्व सामने ग्वाल्हेरच्या नवीन स्टेडियममध्ये होतील. एमपीएलने एक हरित उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये प्रत्येक डॉट बॉलवर एक झाड लावले जाईल. यासोबतच एक नवीन गेमिंग अॅप देखील लाँच करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशमधील क्रिकेटचा सर्वात मोठा आखाडा एमपीएल 2025 येत्या 12 जूनपासून सुरू होणार आहे. या वर्षी 7 पुरुष टीम आणि तीन महिला टीमचा मुकाबला रंगणार आहे. सर्व सामने ग्वाल्हेरच्या नवनिर्मिती माधवराव सिंधिया स्टेडियममध्ये होतील. काल इंदूरमध्ये टीम रीवा जॅग्वार्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एमपीएलचे चेअरमन महानार्यमन सिंधिया यांनी एमपीएलच्या ग्रीन इनिशिएटिव्हची घोषणा केली. सोबतच एमपीएल गेमिंग अॅपही लॉन्च केला.
एमपीएलचे चेअरमन महानार्यमन सिंधिया यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधला. आयपीएलच्या धरतीवर एमपीएलमध्येही प्रत्येक डॉट चेंडूवर एक झाड लावण्यात येणार असल्याचं महानार्यमन यांनी सांगितलं. आज देशाच्या प्रत्येक राज्यात हरित क्रांतीची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड आईच्या नावाने लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण भारतात ही मोहीम सुरू आहे. त्यामुळे एमपीएलही यासाठी आपलं उत्तरदायित्व असल्याचं समजतो. त्यामुळेच एमपीएलच्या या दुसऱ्या पर्वात आम्हीही प्रत्येक डॉट बॉलवर एक झाड लावणार आहोत. त्यामुळे मध्यप्रदेशातील पर्यावरण अधिक चांगलं होईल, असं महानार्यमन यांनी सांगितलं.

mahanaryaman scindia
गेमिंग अॅप लॉन्च
यावेळी महानार्यमन सिंधिया यांच्या हस्ते एमपीएलच्या क्रिकेट गेमिंग अॅपचं लॉन्चिंग करण्यात आलं. एमपीएल क्रिकेट क्लॅशला प्ले स्टोर आणि आयफोन अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. या खेळात प्लेअर त्यांची प्रोफाईल निवडू शकतात. तसेच एमपीएलची स्वत:ची आवडती टीम बनवू शकता. तसेच खेळाडू निवडून फलंदाजी करू शकता.
मध्यप्रदेश क्रिकेट लीग (एमपीएल) 2025 चे आयोजन 12 जूनपासून होणार आहे. या वर्षी 7 पुरुष आणि 3 महिला संघ सहभागी होतील. सर्व सामने ग्वाल्हेरच्या नवीन स्टेडियममध्ये होतील. एमपीएलचे चेअरमन महानार्यमन सिंधिया यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच महानार्यमन सिंधिया यांच्या हस्ते एमपीएलचा… pic.twitter.com/S6Kl11E855
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2025
ज्योतिरादित्य सिंधिया यांचा संदेश काय?
एमपीएलच्या ग्रीन इनिशिएटिव्ह तसेच क्रिकेट गेमिंग अॅप लॉन्चच्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. एमपीएलला सातत्याने मोठा प्रतिसाद मिळत असून यशही मिळत आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खेळाडूंचं कौतुक केलं. तसेच या वर्षाच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या. गेल्या वर्षीपासून एमपीएल सुरू झाली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आयोजकांनी यंदाही एमपीएलचं आयोजन केलं आहे. राज्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करण्यासाठी एमपीएलचं आयोजन केलं जात आहे.
