AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardul Thakur | परिस्थिती गंभीर, शार्दूल खंबीर, तामिळनाडू विरुद्ध ठाकुर याचं अर्धशतक

Shardul Thakur Fifty | शार्दूल ठाकुर याने मुंबई अडचणीत असताना दमदार अर्धशतक ठोकलं आहे. शार्दुलने या अर्धशतकासह मुंबईचा डाव सावरला. हार्दिक तामोरे याने शार्दुलला अप्रतिम साथ दिली.

Shardul Thakur | परिस्थिती गंभीर, शार्दूल खंबीर, तामिळनाडू विरुद्ध ठाकुर याचं अर्धशतक
Updated on: Mar 03, 2024 | 2:39 PM
Share

मुंबई |  शार्दूल ठाकुर याने आपल्याला लॉर्ड का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या शार्दूलने रणजी ट्रॉफी सेमी फायलमध्ये मुंबईकडून खेळताना तामिळनाडू विरुद्ध संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. मुंबईची तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झालेली. मात्र शार्दुलने हार्दिक तामोरे याच्यासह मुंबईचा डाव सावरत दमदार अर्धशतक ठोकलं. शार्दूलच्या या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईला आघाडी घेता आली. तर दुसऱ्या बाजूला हार्दिक तामोरे यानेही चांगली साथ दिली.

मुशीर खान 55 धावांवर आऊट झाल्याने मुंबईची स्थिती 6 बाद 106 अशी झाली. त्यानंतर शार्दुल मैदानात आला. मुशीरनंतर शम्स मुलानी दुसऱ्याच बॉलवर झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 7 बाद 106 असा झाला. त्यानंतर हार्दिक तामोरे आणि शार्दूल ठाकुर यादोघांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी 1-2 धावा घेतल्या. संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. शार्दूलने निर्णायक क्षणी झुंज देत मुंबईसाठी अर्धशतक झळकावलं. शार्दूलला अर्धशतकासाठी 57 चेंडूंचा सामना करावा लागला.

आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी

दरम्यान शार्दूल ठाकुर याच्यासह हार्दिक तामोरे यानेही उल्लेखनीय कामगिरी केली. तामोरेने झुंजार खेळी केली. शार्दुल आणि हार्दिक या दोघांनी खऱ्या अर्थाने मुंबईला सामन्यात कमबॅक करुन दिलं. या दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 105 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर हार्दिक आऊट झाला. हार्दिकने 92 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. तर आता शार्दुलकडून मुंबईच्या चाहत्यांना शतकाची आशा आहे.

शार्दूल ठाकुर-हार्दिक तामोरची शतकी झुंज

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.

तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन | रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.