IPL 2026 : रोहित शर्मा मैदानात दिसणार की नाही? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचने सर्व काही केलं स्पष्ट

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून सर्वच संघांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडूही सराव शिबिरात घाम गाळत आहेत. असं असताना रोहित शर्माबाबत प्रश्नचिन्ह आहे. मैदानात उतरणार की नाही याबाबत हेड कोच महेला जयवर्धनेने स्पष्ट केलं आहे.

IPL 2026 : रोहित शर्मा मैदानात दिसणार की नाही? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचने सर्व काही केलं स्पष्ट
रोहित शर्मा मैदानात दिसणार की नाही? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचने सर्व काही केलं स्पष्ट
Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 17, 2026 | 6:49 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स प्रबळ दावेदार मानली जात आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने तसं वाटणं सहाजिकच आहे. रोहित शर्मादेखील आयपीएल 2025 नंतर पहिल्यांदा टी20 क्रिकेट खेळणार नाही. कारण रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे रोहित शर्माही तयारीला लागला आहे. त्याने फिटनेस आणि फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने पोस्ट केला आहे. यात शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर षटकार मारताना दिसत आहे. पण आयपीएल 2026 स्पर्धेत कसा खेळणार? याबाबत क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला होता. आता मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धनेने याबाबत स्पष्ट सांगितलं आहे. रोहित शर्माची संघात भूमिका काय असणार याबाबत सांगितलं आहे.

रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर की…

मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धने याने सांगितलं की, रोहित शर्मा या स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून नसेल. त्यामुळे रोहित शर्मा मैदानात फिल्डिंग करताना आणि अनुभव शेअर करताना दिसणार आहे. मागच्या पर्वात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला होता. याबाबत महेला जयवर्धनेने सांगितलं की, मागच्या पर्वात रोहित शर्माच्या फिटनेसबाबत काही अडचणी होत्या. त्यामुळे त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट करावं लागलं होतं. तो मैदानात असो की नसो तो संघावर प्रभाव टाकत होता. पण या पर्वात रोहित शर्मा जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहे. संघाचं संतुलन आणि सामन्याची स्थिती याचाही विचार केला जाईल.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा सर्वात प्रभावी फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएल क्रिकेट कारकि‍र्दीत सर्वाधिक सामने मुंबई इंडियन्ससाठी खेळले आहेत. रोहित शर्मा आयपीएलच्या सुरूवातीच्या काळात डेक्कन चार्जर्सकडून खेळला आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून 2011 पासून खेळला. तेव्हापासून आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 5 जेतेपद मिळवली आहेत. आयपीएल क्रिकेट कारकिर्दीत रोहित शर्माने 272 सामने खेळले असून 267 डावात 7046 धावा केल्या आहेत. यात 6000 धावा या मुंबई इंडियन्ससाठी केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us