बीसीसीआयला रोहित शर्माच्या फिटनेसबाबत तीळमात्र कल्पना नाही? MI च्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

आयपीएल 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त एका सामन्याची औपचारिकता राहिली आहे. असं असताना या स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यात रोहित शर्माची निवड केली गेली आहे. पण मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी त्याच्या फिटनेसाबाबत मोठं विधान केलं आहे.

बीसीसीआयला रोहित शर्माच्या फिटनेसबाबत तीळमात्र कल्पना नाही? MI च्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
बीसीसीआयला रोहित शर्माच्या फिटनेसबाबत तीळमात्र कल्पना नाही? MI च्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
Image Credit source: PTI
| Updated on: May 23, 2026 | 6:34 PM

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर पुन्हा एकदा टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेनंतर टीम इंडियाची पहिली मालिका अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. यात एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिकेत रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने फिटनेसच्या आधारावर त्याची निवड केली आहे. बीसीसीआयने त्याच्या नावाची घोषणा करताना सांगितलं की, रोहित शर्मा पूर्णपणे फिट आहे आणि या मालिकेचा भाग होऊ शकतो. दरम्यान, आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तीन आठवडे मैदानापासून दूर होता. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं. पण मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहित शर्माच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. त्यामुळे सर्वांचं टेन्शन दूर झालं आहे.

काय म्हणाले महेला जयवर्धने?

मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने म्हणाले की, ‘माझ्या आणि आमच्या वैद्यकीय पथकाच्या मते, रोहित 100 टक्के तंदुरुस्त आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून परतल्यानंतर पहिल्या सामन्यात आम्ही थोडी सावधगिरी बाळगली होती. आता केवळ संघाच्या रचनेमुळे त्याला ‘इम्पॅक्ट सब’ म्हणून खेळवले जात आहे. रोहित एक सांघिक खेळाडू आहे आणि त्याला हे पूर्णपणे समजते.’ महेला जयवर्धने यांच्या वक्तव्यानंतर रोहित शर्माबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. तसेच रोहित शर्मा आता खेळण्यास फिट असल्याचं स्पष्ट झालं आहे. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्याचं कारणही स्पष्ट झालं आहे. संघाच्या रणनितीमुळे त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवलं जात आहे.

दरम्यान, रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी फिटनेस टेस्ट पास करणं भाग आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय रोहित शर्माच्या फिटनेसबाबत चिंतित आहे. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये तीन आठवड्यात रिपोर्ट केलं नव्हतं. अशा स्थितीत बॉडी हाय परफॉर्मेंस लोड घेणार की नाही, याबाबत चिंता आहे. कारण वनडे क्रिकेटमध्ये 50 षटकं क्षेत्ररक्षण करावं लागतं. वनडे क्रिकेटमध्ये आयपीएलसारखं इम्पॅक्ट प्लेयर पर्याय नसतो. अशा स्थितीत रोहित शर्माच्या फिटनेसबाबत बीसीसीआयला निर्णय घ्यावा लागेल.

Follow Us