AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी साजरं केलं रक्षाबंधन, अर्जून तेंडुलकरने दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला साजरा करणारा आजचा दिवस देशभरातील सर्व भाऊ-बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पण यादिवशी एकमेंकाना प्रत्यक्षात न भेटू शकणारी भावंड व्हर्चुअलरित्या रक्षाबंधन साजरं करत आहेत.

VIDEO : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी साजरं केलं रक्षाबंधन, अर्जून तेंडुलकरने दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा
अर्जून तेंडुलकर
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 12:23 PM
Share

मुंबई : भारतात असंख्य सण साजरे केले जातात. विविध धर्म, विविध जातीचे नागरिक आपआपले सण साजरे करत असतात. पण या सर्वातील एक गोड आणि पवित्र असा सण म्हटलं तर ‘रक्षाबंधन’. भाऊ-बहिण या जगातील सर्वात पवित्र नात्याला आणखी घट्ट करणारा हा उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अलीकडे तर अगदी साता समुद्रापार असणारे भाऊ बहिणही व्हिडीओ कॉलिंगद्वारे हा सण साजरा करतात. अशीच काहीशी शक्कल मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी लढवली आहे. सध्या आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी युएईला असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना त्यांच्या बहिणींनी व्हिडीओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर हा त्याची बहिण सारासोबत व्हिडीओ कॉलवर एकमेंकाना शुभेच्छा देत आहे. याशिवाय यष्टीरक्षक आदित्य तारे, बॅट्समन अनमोलप्रीत सिंग आणि बोलर युधवीर सिंग हेही आपल्या बहिणींसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत आहेत. विशेष म्हणजे अर्जून तेंडुलकरने थेट मराठीत सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा गोड व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे…

उर्वरीत आयपीएलची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून

कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात मध्येच थांबवण्यात आलेली उर्वरीत आयपीएल युएईमध्ये पार पडणार आहे. 19 सप्टेंबरपासून सामन्यांना पुन्हा सुरुवात होणार आहे. उर्वरीत 31 सामन्यांची सुरुवात बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स CSK vs MI) यांच्याच सामन्याने होणार आहे. सध्या सर्व संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असून एक एक करुन युएईमध्ये पोहचत आहेत.

इतर बातम्या

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(Mumbai indians players including arjun tendulkar celebrates rakshabandhan shares video on instagram)

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला