MI vs SRH Live Score Updates, IPL 2026: मुंबईच्या सलामी जोडीची कमाल, विल-रायनची अर्धशतकी भागीदारी
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Indian Premier League 2026 Live Score: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2026 स्पर्धेच्या 41 वा सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
MI vs SRH Live Score Updates : विल-रायनची अर्धशतकी भागीदारी, मुंबईची आक्रमक सुरुवात
विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. विल आणि रायन या दोघांनी पहिल्या 5 ओव्हरमध्ये 60 धावा जोडल्या आहेत. रायन 20 तर विल 37 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईच्या सलामी जोडीची कमाल, विल-रायनकडून विस्फोटक सुरुवात
विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन या नव्या सलामी जोडीने मुंबई इंडियन्सला जबरदस्त अशी सुरुवात मिळवून दिली आहे. मुंबईने 3 ओव्हरमध्ये 37 रनस जोडल्या आहेत. विल 17 आणि रायन 19 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
-
-
MI vs SRH Live Score Updates : मुंबईची बॅटिंग, विल जॅक्स-रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात
मुंबई विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईसाठी रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), रॉबिन मिन्झ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर आणि अश्वनी कुमार.
-
MI vs SRH Live Updates : सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्ष दुबे, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे आणि एशान मलिंगा.
-
-
MI vs SRH Live Updates : मुंबईने हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय
सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने बँटिंगचा निर्णय घेतला आहे.
-
MI vs SRH Live Updates : मुंबईसमोर हैदराबादचं आव्हान, वानखेडेत कोण जिंकणार? थोड्याच वेळात टॉस
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. आता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई हैदराबादवर वरचढ, पाहा हेड टु हेड रेकॉर्ड्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. उभयसंघात बुधवारी होणारा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 26 वा सामना असणार आहे. मुंबईने 25 पैकी सर्वाधिक 15 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने मुंबई विरुद्ध 10 सामन्यांत विजय मिळवला आहे.
-
MI vs SRH Live Updates : सनरायजर्स हैदराबाद टीम
सलील अरोरा (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीशकुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, शिवांग कुमार, साकिब हुसेन, प्रफुल्ल हिंगे, एशान मलिंगा, स्मरण रविचंद्रन, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे, हर्षल पटेल, कामिंदू मेंडीस, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, शिवम मावी, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, क्रेन्स फुलेत्रा, ओंकार तरमाळे आणि अमित कुमार.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, केशव महाराज, जसप्रीत बुमराह, क्रिश भगत, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, विल जॅक्स, राज बावा, शार्दुल ठाकूर, दानिश मालेवार, मयंक रावत, कॉर्बिन बॉश, रघु शर्मा, रोहित शर्मा, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
MI vs SRH Live Updates : मुंबई-हैदराबाद आमनेसामने, पलटण ऑरेंज आर्मीला पराभूत करणार?
मुंबई इंडियन्स घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या मोहिमेतील आठव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2 हात करणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 41 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. मुंबईचा हा आठवा तर हैदराबादचा नववा सामना आहे. मुंबईने आतापर्यंत 7 पैकी 5 सामने गमावले आहेत. तसेच मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये गेल्या सलग 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबईसमोर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. तर हैदराबादने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हैदराबादचा 2 गुण मिळवून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकण्यासाठी सज्ज आहे. या निमित्ताने सामन्यातील प्रत्येक अपडेट आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.