रोहित शर्माला खराब फॉर्ममध्ये असताना मिळाली कर्णधाराची साथ, म्हणाला…
रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करत आहे. फलंदाजीत वारंवार अपयशी ठरत असल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात बेंचवर बसण्याची वेळ आली. आता रोहित शर्मा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात लिटमस टेस्ट होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला आहे. यासाठी रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळताना दिसणार आहे. रणजी स्पर्धेत मुंबई संघाकडून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. 23 जानेवारीला जम्मू काश्मीरविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा कधी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. असं असताना मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने रोहित शर्माची पाठराखण केली आहे. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, रोहित शर्मा मैदानात उतरेल आणि मोठी धावसंख्या करेल. त्याच्या धावांची भूक स्पष्टपणे दिसत आहे.
अजिंक्य रहाणेने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘रोहित हा रोहित आहे, आम्हाला सर्वांना माहिती आहे. मी रोहित आणि यशस्वीला ड्रेसिंग रुममध्ये पाहून खरंच खूश आहे. रोहितला त्याचा खेळ माहिती आहे. त्यामुळे त्याला काही नवीन सांगण्याची गरज नाही. मला विश्वास आहे की, तो मैदानात उतरेल आणि चांगली कामगिरी करेल. त्याच्यात सुरुवातीपासून आतापर्यंत काहीच बदल झालेला नाही आणि ही चांगली बाब आहे.’
मुंबई रणजी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितलं की,’खेळाडूच्या क्रिकेट कारकिर्दित चढउतार येत असतात. यात रोहितसोबत एक चांगली बाब अशी की त्याची धावांची भूख अजूनही कायम आहे. त्याने सरावात चांगली फलंदाजी केली आहे आणि मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.’ रणजी स्पर्धेत रोहित शर्मा फक्त जम्मू काश्मीर विरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. कारण यानंतर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 205 साठी टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
मुंबई संघ : रोहित शर्मा, आंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, आकाश आनंद (विकेटकीपर), शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, हिमांशू सिंग, एम जुनेद खान, रॉयस्टन डायस, पृथ्वी शॉ, तनुष कोटियन, कर्श कोठारी, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिल्वेस्टर डीसूझा, सिद्धांत अधातराव, शिवम दुबे