Sarfarz Khanचा डबल धमाका, यशस्वीसह रवी शास्त्रींना पछाडलं
Sarfaraz Khan Double Century: मुंबईचा अनुभवी फलंदाज सर्फराज खान याने रेस्ट ऑफ इंडिया विरूद्ध इराणी कप स्पर्धेतील सामन्यात द्विशतकी खेळी केली. सर्फराज दुसऱ्या दिवशी नाबाद परतला.
बांगलादेश विरूद्धच्या दोन्ही कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी न मिळालेल्या सर्फराज खान याने इराणी कप ट्रॉफीत द्विशतकी खेळी केली. मुंबईकडून सर्फराज रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध ही कामगिरी केली. सर्फराजच्या या खेळीमुळे मुंबईला दुसऱ्या दिवशी 500 पार मजल मारता आली. मुंबईने दुसऱ्या दिवसापर्यंत 9 विकेट्स गमावून 536 धावा केल्या. तर सर्फराज 221 चेंडूत 24 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 221 धावा केल्या आहेत. सर्फराज इराणी कपमध्ये द्विशतक करणारा पहिला मुंबईकर ठरला. तसेच सर्फराजने यासह रवी शास्त्री आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचा रेकॉर्डही ब्रेक केला आहे.
सर्फराज 221 धावांवर नाबाद परतला. सर्फराज यासह इराणी कपमधील एका डावात पाचवी मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. सर्फराजने यासह यशस्वी आणि शास्त्री या दोघांना पछाडलं. शास्त्री यांनी 1990 साली इराणी कपमध्ये रेस्ट ऑफ इंडियाकडून 217 धावा केल्या होत्या. तर यशस्वीने रेस्ट ऑफ इंडियाकडून 2023 मध्ये 213 धावा केल्या होत्या.
2 दिग्गजांना पछाडण्याची संधी
आता सर्फराजकडे तिसऱ्या दिवशी आणखी काही धावा करुन प्रवीण आमरे आणि सुरेंद्र अमरनाथ या दोघांना मागे टाकण्याची संधी आहे. इराणी कपमध्ये एका डावात सर्वाधिक धावांचा विक्रम हा वसीम जाफर याच्या नावावर आहे. जाफरने 2018 मध्ये रेस्ट ऑफ इंडियाकडून 286 धावा केल्या होत्या.
इराणी कपमध्ये एका डावात सर्वाधिक धावा
वसीम जाफर- 286 धावा
मुरली विजय- 266 धावा
प्रवीण आमरे- 246 धावा
सुरेंद्र अमरनाथ- 235 धावा
सर्फराज खान- 221 धावा
रवी शास्त्री- 217 धावा
यशस्वी जयस्वाल- 213 धावा
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.
रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.