.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NED vs SL | श्रीलंकेचा सलग 3 पराभवानंतर पहिला विजय, नेदरलँड्सची अखेरपर्यंत कडवी झुंज

Netherlands vs Sri lanka | श्रीलंकेला अखेर 3 सामन्यात पराभूत झाल्यानंतर चौथ्या मॅचमध्ये विजय मिळवण्यात यश आलं आहे. नेदरलँडसने श्रीलंकेला अखेरपर्यंत झुंजवलं मात्र श्रीलंकेने बाजी मारली.

NED vs SL | श्रीलंकेचा सलग 3 पराभवानंतर पहिला विजय, नेदरलँड्सची अखेरपर्यंत कडवी  झुंज
| Updated on: Oct 21, 2023 | 7:58 PM
Share

लखनऊ | श्रीलंका क्रिकेट टीमने अखेर रडत रडत नेदरलँड्ससमोर विजयाचं खातं उघडलं आहे. श्रीलंकेने सलग 3 सामने गमावल्यानंतर चौथ्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. नेदरलँड्सने श्रीलंकेला विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं होतं. नेदरलँड्सने सहजासहजी हार मानली नाही. नेदरलँड्सने अखेरपर्यंत लढत देत श्रीलंकेला झुंजवलं. मात्र श्रीलंकेने 5 विकेट्स गमावून 263 धावांचं आव्हान हे 10 बॉलआधी पूर्ण केलं. सदीरा समरविक्रमा हा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. सदीराने नाबाद 91 धावांची खेळी केली.

ओपनर पाथुम निसांका याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. कुसल परेरा 5 धावा करुन तंबूत परतला. कॅप्टन कुसल मेंडीस स्वसतात 11 धावांवर परतला.  चरिथ असलंका याने 44 धावांची खेळी केली. तर धनंजया डी सिल्वा याने 30 धावांचं योगदान दिलं. तर सदीरा समरविक्रमा आणि दुशानन हेमंथा या जोडीने श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं. सदीरा समरविक्रमा याने 107 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 91 रन्स केल्या. तर दुशानने नाबाद 4 धावांचं योगदान दिलं. नेदरलँड्सकडून आर्यन दत्त याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पॉल व्हॅन मीकरेन आणि कॉलिन अकरमन या एकरमन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

त्याआधी नेदरलँड्सकडून लोगान वॅन बीक आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट या दोघांनी सातव्या विकेटसाठी 130 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर नेदरलँड्सने 49.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 262 धावा केल्या. सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर लोगान वॅन बीकने 59 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. दिलशान मधुशंका आणि कसुन राजिथा या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर महीश तीक्षणा याने 1 विकेट घेतली.

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडीस (कॅप्टन आणि विकेटकीपर) पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्षना, कसून रजिथा आणि दिलशान मधुशंका.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर