AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Netherland vs India | नेदरलँडची वर्ल्ड कपमध्ये धडक, आता टीम इंडिया विरुद्ध भिडणार

Netherland vs Scotand CWC Qualifiers 2023| नेदरलँडच्या विजयामुळे भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रकाचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे.

Netherland vs India | नेदरलँडची वर्ल्ड कपमध्ये धडक, आता टीम इंडिया विरुद्ध भिडणार
| Updated on: Jul 06, 2023 | 10:19 PM
Share

बुलावायो | नेदरलँड क्रिकेट टीमने 12 वर्षांनंतर पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी क्वालिफाय केलं आहे. नेदरलँड भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत पोहचणारी दहावी आणि शेवटची टीम ठरली आहे. आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर्स सुपर 6 स्पर्धेतील 8 वा सामना हा नेदरलँड विरुद्ध स्कॉटलँड यांच्यात पार पडला. हा सामना जिंकणारी टीम वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करणार होती. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. मात्र नेदरलँड स्कॉटलँडवर 4 विकेट्सने विजय मिळवत 2011 नंतर वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली.

नेदरलँड पाचव्यांदा वर्ल्ड कप खेळणार!

नेदरलँडची वर्ल्ड कप स्पर्धेत पोहचण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. नेदरलँड याआधी 1996, 2003, 2007 आणि 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरली होती.

सामन्याचा धावता आढावा

नेदरलँडने टॉस जिंकून स्कॉटलँडला बॅटिंगसाठी भाग पाडलेलं. स्कॉटलँडने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 277 धावा केल्या. त्यामुळे नेदरलँडला विजयासाठी 278 धावांचं आव्हान मिळालं. नेदरलँडने हे विजयी आव्हान 43 बॉलआधी 42.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बास डी लीडे नेदरलँडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. लीडे याने पहिले 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 278 धावांचं पाठलाग करताना 92 बॉलमध्ये 123 धावांची शतकी खेळी केली. तर सलामीवीर विक्रमजीत सिंह याने 40 धावांची महत्वाची खेळी केली.

श्रीलंका नववी आणि नेदरलँड दहावी टीम

नेदरलँडआधी श्रीलंकेने झिंबाब्वेवर विजय मिळवला. त्यासह श्रीलंका वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करणारी नववी टीम ठरली होती. श्रीलंका आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत ग्रुप 2 मध्ये होती. त्यामुळे श्रीलंका ही क्वालिफायर 2 (Q2) टीम आहे. तर आता नेदरलँड ग्रुप 1 मधून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरली. त्यामुळे नेदरलँड (Q1) टीम आहे.

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारे 10 संघ

टीम इंडिया,न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, अफगानिस्तान, बांग्लादेश, इंग्लंड, श्रीलंका (Q2)आणि नेदरलँड (Q1)

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड

आयसीसीने काही दिवसांपूर्वी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यामध्ये टीम इंडिया कोणत्या 7 संघांविरुद्ध खेळणार हे स्पष्ट होतं. मात्र तेव्हा 2 संघ ठरले नव्हते. मात्र आता चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे टीम इंडियाचा 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे.

तर 11 नोव्हेंबर रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड आमनेसामने असतील. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीमधील शेवटचा सामना असणार आहे.

नेदरलँड प्लेइंग इलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, वेस्ली बॅरेसी, बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, तेजा निदामनुरु, रायन क्लेन, आर्यन दत्त आणि क्लेटन फ्लॉयड.

स्कॉटलँड प्लेइंग इलेव्हन | रिची बेरिंग्टन (कर्णधार), क्रिस्टोफर मॅकब्राइड, मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, टॉमस मॅकिंटॉश, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॅट, सफियान शरीफ आणि ख्रिस सोल.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.